पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

62

मुंबई :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल (Scholarship Result ) मंगळवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आला आहे.

राज्य परीक्षा परिषदेने 7 नोव्हेंबरला झालेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर केला होता. त्यानंतर 7 ते 17 नोव्हेंबर दरम्यान शाळेकडून गुण पडताळणीसाठीच्या अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जाची छाननी करून मंगळवारी रात्री हा निकाल जाहीर करण्यात आला आहे

शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल आपल्या लॉग इनमधून; तसेच पालकांना त्यांच्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.https://www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून दिल्या आला आहे.