मुल चंद्रपूर राष्ट्रीय मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात अपघातात युवती जागीच ठार

76

मुल – शहरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर मुल-चंद्रपूर मार्गावर रान तलावाजवळ ट्रक-बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.ही घटना (२९ डिसें) दुपारी दोन वाजता चे सुमारास घडली. यात बस मध्ये मागच्या सीटवर बसलेली मुलगी जागीच ठार झाली असून काही प्रवाशी किरकोळ जखमी आहे.

तर ट्रक चालक घटना स्थळावरून ट्रक ठेऊन फरार झाला. तेजस्विनी नारायण कोडवते वय (२४ ) वर्ष असे मृत युवतीचे नाव असून ती एकलपुर तालुका वडसा जिल्हा गडचिरोली येथील रहिवाशी आहे.

गडचिरोली वरून चंद्रपूर कडे जात असलेली बस क्रमांक एम. एच. ४० वाय ५८०७ जात होती. तर चंद्रपूर वरून मुल कडे येणारा ट्रक क्रमांक सी.जी. ०७ बी.पी. ४०२७ क्रमांकाचा ट्रक मुल कडे भरधाव वेगाने येत होता. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन विरुध्द दिशेने एस टी बसला जोरदार धडक दिली.

अपघात एवढा भीषण होता की युवतीचा डावा हात तुटून रस्त्यावर पडला.सदर युवतीचा मृतदेह उत्तरीय तपासणी करीता मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून ट्रक चालका विरुद्ध मर्ग दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास मुल पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीशसिंह राजपूत करीत आहे. सदरची घटना ही मुल शहरापासून काही अंतरावर घडली घटनेची माहिती मुल पोलीसांना कळताच पोलिस घटनास्थळी जाऊन जखमी प्रवाशांना बाहेर काढले. याप्रसंगी नागरिकांनी सुद्धा जखमींना रुग्णालयात पोहचविण्यासठी मदत केली.