अधिवासी हे प्रमाणपत्र नसणाऱ्या पथविक्रेत्यांना देखील पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा लाभ

83

अधिवास प्रमाणपत्र जरी पथविक्रेत्यांकडे उपलब्ध नसले तरी त्या पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. त्याअनुषंगाने आता महाराष्ट्र राज्याचा अधिवासी हे प्रमाणपत्र नसणाऱ्या पथविक्रेत्यांनादेखील पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा लाभ घेता येणार आहे.

सन २०१९-२० मध्ये करण्यात आलेल्या मोबाइल सर्वेक्षणानुसार, पालिका क्षेत्रात एकूण  फेरीवाल्यांची नोंद आहे. पैकी पथविक्रेत्यांना ओळखपत्र देण्यात आले. दुसरीकडे तब्बल  जणांना पीएम स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात आला. पथविक्रेत्यांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसले तरी या कारणामुळे सर्वेक्षणातून त्याचे नाव वगळले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करताना, यादी तयार करताना, नोंदणी करताना व पथविक्रेत्यांना विक्री प्रमाणपत्र प्रदान करताना ‘महाराष्ट्र राज्याचा अधिवासी’ हा निकष लागू करण्यात येऊ नये, असे नगरविकास विभागाने १२ डिसेंबरच्या शासन निर्णयान्वये बजावले आहे. प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वनिधी योजनेसाठी पालिकेला एकूण पथविक्रेत्यांचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यासाठी प्रशासनाला  अर्ज प्राप्त झाले. पैकी  अर्ज पात्र ठरले. अर्ज बँकांनी परत केले. तर अर्ज अपात्र ठरले.

पथविक्रेत्यांना आर्थिक मदत कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण भारतामध्ये टाळेबंदी लागू झाल्यामुळे फेरीवाल्यांवर मोठा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यांचे व्यवसाय डबघाईस आले. त्याचा परिणाम त्यांच्या उपजीविकेवर झाला. त्यामुळे पथविक्रेत्यांना व्यवसायामध्ये खेळते भांडवल उपलब्ध करून त्यांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वनिधी योजना सुरु करण्यात आली. त्यासाठी १७ जून २०२० रोजी शासननिर्णय काढण्यात आला.

पथविक्रेत्यांना मिळाले कर्ज पालिका क्षेत्रासाठी बँकेने  प्रकरणे मंजूर केली. पैकी प्रथम कर्ज म्हणून प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात आले. तर, २० हजारांच्या द्वितीय कर्जासाठी  अर्ज आले. पैकी  प्रकरणे बँकेने मंजूर केले. तर त्यापैकी  जणांना कर्ज दिले. तृतीय कर्ज म्हणून ५० हजारांसाठी १ अर्ज मंजूर करण्यात आले. एकूण  पथविक्रेत्यांना ते आर्थिक साहाय्य करण्यात आले.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत लाभ किती मिळतो

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत खालील प्रमाणे लाभ मिळतो. Pm Swanidhi Yojana Maharashtra 

1. या योजनेच्या अंतर्गत पतविक्रेत्याला सुरुवातीला दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज एका वर्षाच्या मुदतीसाठी दिले जाते. एका वर्षानंतर पत विक्रेत्याला या योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जाची प्रत्येक महिन्याला हप्त्या द्वारे परतफेड करावी लागते.

2. पथविक्रेत्यांनी पहिल्या दहा हजार रुपयांच्या कर्जाची वेळेत परतफेड केल्यास त्या पथविक्रेत्यास वीस हजार रुपये नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

3. आता पतविक्रेत्यांनी मिळवलेल्या वीस हजार रुपये कर्जाची पूर्ण परतफेड केल्यास तो पतविक्रेता आता पन्नास हजार रुपये कर्ज घेण्यास पात्र असून त्याकरिता तो अर्ज करू शकतो.

4. व पन्नास हजार रुपये स्व निधी कर्ज मिळण्यास अर्ज केल्यानंतर त्याला ते कर्ज मिळतील. 

5. प्रधानमंत्री स्व निधी योजना अंतर्गत पथविक्रेत्यांनी मिळवलेल्या कर्जाची वेळेच्या आत परतफेड केल्यास त्यांना 7 % व्याज अनुदान म्हणून मिळते. 

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची वैशिष्ट्ये 

मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने पथविक्रेत्यांकरिता राबविण्यात येणारी प्रधानमंत्री स्वनिधी योजना(pradhanmantri Svanidhi Yojana) ची खालील प्रमाणे वैशिष्ट्ये आहेत. Pradhan Mantri Svanidhi Yojana

या योजनेअंतर्गत पतविक्रेत्यांना सुरुवातीला वीस हजार व दहा हजार रुपये या प्रमाणात कर्ज मिळते त्यानंतर त्यांनी कर्जाची योग्य वेळेत परतफेड केल्यास अशा पत्रिक्रेत्यांना पन्नास हजार रुपये कर्ज मिळण्यास पात्र ठरवण्यात येते. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना जास्त कर्ज देऊन प्रोत्साहन देण्यात येते. या योजनेअंतर्गत मिळवलेले कर्ज डिजिटल पद्धतीने परत करता येते त्यामुळे डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन मिळते.Pradhan Mantri Svanidhi Yojana Maharashtra 2022

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री स्व निधी योजना Pradhan Mantri Svanidhi Yojana अंतर्गत केवळ पथविक्रेत्यांनाच लाभ मिळतो, जर तुम्ही असाल तर खालील कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. Pm svanidhi Information in Marathi 

1. आधार कार्ड

2. पथविक्रेता प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र

3. मतदान कार्ड

4. बँक पासबुक

वर दिलेली चार कागदपत्रे असल्यास आपण या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याकरिता ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो.