गाडीची दुचाकीला धडक पती पत्नी गंभीर जखमी

80

मुल – तालुक्यातील चितेगाव जवळ ब्रेजा गाडीने दुचाकी वाहनाला मागच्या बाजुने जोरदार धडक दिल्याने पती पत्नी गंभिर जखमी झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजताचे दरम्यान घडली. वसंत रावजी नरोटे, ललिता वसंत नरोटे रा. माडे आमगाव तालुका चामोर्शी असे जखमी झालेल्या पती पत्नीचे नाव आहे.

जखमींना मूल येथिल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून जखमींना पुढील उपचाराकरीता चंद्रपूर येथिल जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

धडक दिलेल्या ब्रेजा या चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी पती पत्नी हे आपल्या मुलाला भेटण्याकरीता सरडपार येथे जात होते. मुख्य मार्गावर चितेगांव जवळ एका ब्रेकरवर ब्रेक केला असता मागनु येत असलेली ब्रेजा या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुद्धे आणि मुल पोलीस करीत आहे.