मूल तालुक्यात 4 कांग्रेस तर 3 भाजपाचे सरपंच

70

मूल :-मूल तालुक्यातील सात ग्रामपंचायतीचा निकाल आज निवडणूक प्रशासनाने जाहीर केला. या निवडणुकीत बेंबाळ,बाबराळा,आकापूर,चक दुगाळा या 4 ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस तर उश्राळा,गडिसुर्ला,बोंडाळा( खुर्द ) या 3 ग्रामपंचीयतीमध्ये भाजपाचे सरपंच विजयी झाले. बेंबाळ येथे चांगदेव काशिनाथ केमेकार,चक दुगाळा येथे प्रिती रमेश भांडेकर, बाबराळा येथे धिरज मनोहर गोहणे,आकापूर येथे भास्कर आबाजी हजारे या चार ठिकानी कांग्रेस प्रणित सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले. तर उश्राळा येथे प्रियंका लोकनाथ नर्मलवार, गडिसुर्ला येथे शारदा संजय येनुरकर आणि बोंडाळा (खुर्द ) येथे सोनल नंदाजी बांगरे या तीन ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले.
सातही ग्रामपंचायतीमध्ये चुरसीची आणि प्रतिष्ठेची लढत होती. तालुक्यातील मोठी व संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या बेंबाळ येथिल ग्रामपंचायत निवडणुकीत मूल तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष वेधले होते.ही ग्रामपंचायत कांग्रेसने भाजपा कडून हस्तगत केली आहे. आकापूर ग्रामपंचायतीमध्ये कांग्रेसने आपली 40 वर्षाची विजयांची परंपरा कायम ठेवित सर्व उमेदवार निवडून आणून निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. एकंदरीत पाहता या ग्रामपंचायत निवडणुकीत कांग्रेसने बाजी मारली आहे.