समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना आरोग्य विम्याची सुविधा

99

आयुष्मान भारत योजन किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकार गरीब कुटूंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करते. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत आयुष्यमान भारत योजना देशभरात चालवली जात आहे. भारत सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील १० कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळेल. यासाठी तुम्हाला आयुष्मान भारतचे कार्ड बनवावे लागेल, त्यासाठी काही आवश्यक पात्रता निर्धारित करण्यात आलीय. पात्र लोक हे कार्ड बनवू शकतात आणि हॉस्पिटलमध्ये ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात.

आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना आरोग्य विम्याची सुविधा मिळते. एबीवाय योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाही संबोधले जाते. या योजनेच्या माध्यमातून देशातील 10 कोटी कुटूंबांना प्रतिवर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत आहे.

आयुष्मान भारत योजनेचे उदिष्ट 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘प्रधानमंत्री जन आरोग्य’ योजनेची (आयुष्मान भारत योजना ) घोषणा केली आहे. ही योजना पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी २५ सप्टेंबर २०१९ पासून देशभर लागू करण्यात आली. सरकार एबीवायच्या माध्यमातून गरीब, उपेक्षित कुटूंब व शहरी गरीब कुटूंबातील सदस्यांना आरोग्य विमा उपलब्ध करणार आहे.

सामाजिक-आर्थिक जाती जनगणना (एसईसीसी) २०११ नुसार ग्रामीण भागातील ८.०३ कोटी कुटूंब आणि शहरी भागातील २.३३ कोटी कुटूंबे आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत येतील. सध्या आयुष्मान भारत योजनेत ६२,६६७ कूटूंब पात्र आहेत. अशा प्रकारे पीएम जय योजनेच्या कक्षेत ५० कोटी लोक येतील.

आयुष्मान भारत योजनेत (ABY) प्रत्येक कुटंबाला प्रतिवर्ष पाच लाख रुपयांचा वैद्यकीय विम्याचा लाभ मिळत आहेत. २००८ मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय आरोग्य विमा योजना (NHBY) आयुष्मान भारत योजना (PM-JAY) योजनेत विलीन करण्यात आली आहे.

एबीवायमध्ये कोणाला मिळत आहे विमा कव्हर ?

केंद्रातील मोदी सरकारचा प्रयत्न आहे की, महिला, लहान मुले व वरिष्ठ नागरिकांना एबीवाय योजनेत प्राधान्याने सामील करून घेतले जाईल. आयुष्मान भारत योजनेचा (एबीवाय) लाभ घेण्यासाठी कुटूंबाचा आकार व वयाचे कोणतेही बंधन नाही.

सर्व सरकारी रुग्णालये व पॅनलमध्ये सामील रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या (एबीवाय) लाभार्थ्यांवर कॅशलेस/पेपरलेस उपचार केले जातील.

आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता निश्चित कशी होते?

SECC च्या आकडेवारीनुसार आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) लोकांना आरोग्य विमा मिळत आहे. एसईसीसीच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील D1, D2, D3, D4, D5 आणि D7 कॅटेगरीतील लोक आयुष्मान भारत योजनेत सामील करण्यात आले आहेत.

शहरी भागात ११ पूर्व निर्धारित पेशा/कामानुसार लोक आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) सामील होऊ शकतात. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेत आधीपासूनच समाविष्ट लोक आपोआप आयुष्मान भारत योजनेत सामील झाले आहेत.

ग्रामीण भागात आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता –

आयुष्मान भारत योजना (एबीवाई) मध्ये सामील होण्यासाठी खालील पात्रता निश्चित करण्यात आली आहे –

ग्रामीण भागात पक्के घर नसलेले, कुटूंबात वयस्क (१६-५९ वर्ष) नसणे, कुटूंब प्रमुख महिला असणे, कुटूंबात कोणी दिव्यांग असणे, अनुसूचित जाती/जमातीमधील व्यक्ती, भूमिहीन व्यक्ति/ वेठबिगार मजूर यांना या योजनेसाठी पात्र समजले जाते.त्याचबरोबर ग्रामीण परिसरातील बेघर व्यक्ति, निराधार, भीक मागणारे, आदिवासी आदि लोक कोणतही प्रक्रिया न करता आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात.शहरी आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता –आयुष्मान भारत योजना (एबीवाय) मध्ये सामील होण्यासाठी खास पात्रता खालीलप्रमाणे आहे –
 कचरा वेचणारे, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, शिवणकाम करणारे, फेरी वाले, रस्त्यावर काम करणारे अन्य व्यक्ती.कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे मजूर, प्लंबर, मिस्त्री, पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक, हमाल व सामान वाहून नेणारे अन्य कामगार. सफाई कर्मचारी, मोल मजूरी करणारे, हँडीक्राफ्टचे काम करणारे, टेलर, ड्रायव्हर, रिक्षा चालक, दुकानात काम करणारे लोक आदि आयुष्मान भारत योजनेसाठी (ABY) पात्र ठरवण्यात आले आहेत.

आयुष्मान भारत योजनेत रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया –आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) लाभार्थी रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना कोणताही फी भरावी लागणार नाही. रुग्णालयात दाखल झाल्यापासून उपचाराचा संपूर्ण खर्च या योजनेच्या माध्यमातून कव्हर केला जाईल.

आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतरचा खर्चही कव्हर केला जाईल.योजनेच्या पॅनलमध्ये सामील प्रत्येक रुग्णालयात एक आयुष्मान मित्र असेल. तो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हरसंभव मदत करेल व त्याला रुग्णालयातील सुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरि मदत करेल.रुग्णालयात एक हेल्प डेस्क सुद्धा असेल जेथे कागदपत्र तपासणी, योजनेत नामांकनासाठी व्हेरिफिकेशन यासाठी मदत केली जाईल.आयुष्मान भारत योजनेत सामील व्यक्ती देशातील कोणत्याही सरकारी व पॅनलमध्ये समाविष्ट खासगी रुग्णालयात मोफत उपचार प्राप्त करेल.आयुष्मान भारत योजनेत काय-काय आहे सामील?आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) जवळपास सर्व आजारांवर उपचार व रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च कव्हर केला जातो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) १३५४ पॅकेज सामील केले आहेत. यामध्ये कोरोनरी बायपास, गुडघे बदलणे व स्टंट लावण्यासारखे उपचारही सामील आहेत.

आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) उपचाराचा खर्च केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेहून (सीजीएचएस) १५-२० टक्के कमी आहे.एबीवाय (ABY) लाभार्थ्यांची योग्यता काय आहे?

आयुष्मान भारत योजनेचा (एबीवाय) लाभ घेण्यासाठी कोणताही औपचारिक प्रक्रिया नाही. एकदा या योजनेसाठी पात्र ठरवले गेल्यास तुम्ही थेट कोणत्याही आजारावर उपचार करू शकता. सरकारद्वारे निश्चित केलेल्या कुटूंबातील सदस्य आयुष्मान भारत योजनेत सामील होई शकतात.केंद्र सरकार सर्व राज्य सरकारे व विभागातील अन्य संबंधित एजन्सीसोबत एबीवायच्या दृष्टीने योग्य कुटूंबाची माहिती शेअर करेल. त्यानंतर संबंधित कुटूंबाला एक फॅमिली आयडेंटिफिकेशन नंबर मिळेल. या यादीत समाविष्ट लोकच आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ज्या लोकांकडे २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेचे कार्ड असेल ते सुद्धा आयुष्मान भारत योजना (एबीवाय ) चा लाभ घेऊ शकता.
कोणत्या रुग्णालयात होईल एबीवाय लाभार्थ्यांवर उपचार?
देशातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेतील (एबीवाय) लाभार्थी उपचार करू शकतात. त्याचबरोबर सरकारच्या पॅनलमध्ये सामील खासगी रुग्णालयातही एबीवायचे लाभार्थी उपचार करू शकतात.
पॅनलमध्ये सामील होणाऱ्या खासगी रुग्णालयात कमीत कमी १० बेड आणि ही बेड संख्या वाढविण्याची क्षमता असली पाहिजे.लाभार्थी सरकार द्वारे आयुष्मान भारत योजनेसाठी जारी १४५५५ या हेल्पलाइन नंबर वरही कॉल करू शकतात.