मूल तालुक्यातील मतदाराचा ग्रामपंचायत निवडणूकीत प्रचंड प्रतिसाद

80

 तालुक्यात 07 ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान पार पडले. तालुक्यात सरासरी 87.38 % मतदान झाले. यामध्ये  स्त्रियांनी तर  पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण  मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला, तालुक्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नसून सर्वत्र शांततेत मतदान पार पडले असल्याची माहिती  तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी यांनी दिली आहे.

तालुक्यातील बेंबाळ,गडीसूर्ला,बाबराळा,बोंडळा खुर्द,उश्राळा,आकापूर,चकदुगाळा  या ठिकाणी चुरशीने मतदान झाले.
बाहेरगावच्या मतदारांना मतदानासाठी घेऊन येण्यासाठी सर्वच उमेदवारांची सकाळपासून धावपळ सुरू असल्याचे दिसून आले.तालुक्यातील अति संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.