Home आपला जिल्हा Breaking News ज्ञानजोती आधार योजनेखाली ओबीसी विद्यार्थी विद्यार्थीनीला बाहेरगांवी शिक्षणासाठी वर्षाला 80 हजार रूपये...

ज्ञानजोती आधार योजनेखाली ओबीसी विद्यार्थी विद्यार्थीनीला बाहेरगांवी शिक्षणासाठी वर्षाला 80 हजार रूपये अनुदान देणारी योजना सुरू करावी- जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले

118
ज्ञानजोती आधार योजनेखाली ओबीसी विद्यार्थी विद्यार्थीनीला बाहेरगांवी शिक्षणासाठी वर्षाला 80 हजार रूपये अनुदान देणारी योजना सुरू करावी यासाठी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मूल तालुक्यातील शाळा—महाविद्यालय बंदचे आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व  समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले यांनी केले.
ओबीसींची वस्तीगृहे खाजगी संस्थांना देण्यांचा शासन निर्णय रद्द करा, शासनाने स्वत:500 कोटी खर्च करून 72 वस्तीगृहे सुरू करा, केजी टू पीजी पर्यंत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करा, राज्यातील सर्व विद्यार्थाना मोफत एसटी पास योजना सुरू करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन समता परिषदेचे पदाधिकारी यांनी नायब तहसिलदार यशवंत पवार यांना दिले. 
यावेळी महिला जिल्हा कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे,जिल्हा परिषद सदस्य प्रा.रामभाऊ महाडोळे, गंगाधर कुनघाडकर, समता परिषद जिल्हा सल्लागार गुरु गुरूनुले,अनिल सोनुले सरपंच सुशी अतुल बुरांडे उपसरपंच, ओमदेव मोहुलें,राकेश मोहुलें,नंदू बारस्कर, दिपक महाडोळे, दुशांत महाडोळे, सौरभ वाढई, चतुर  मोहुलें, प्रशांत भरतकर, प्रशांत गावतुरे, परशुराम शेंडे, विनोद कामडी, नितीन मोहुले ,विवेक मांदाडे, सीमा लोनबले प्रा.अर्चना चावरे,जया ढवस,उषा चुधरी, सुरेखा गभने,कल्पना कराडे,वर्षा कनघाडकर शाळेचे विद्यार्थी विद्यार्थीनी,समता परीषदेचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.