मुल येथे कुजलेल्या अवस्थेत आढळला अज्ञाताचा मृतदेह

65

मुल येथील तहसील कार्यालयाच्यामागील बाजूला असलेल्या श्यामामुखर्जी वाचनालयाच्या जवळील
विहीरगाव परिसरात रस्त्याच्या एकाअज्ञाताचा मृतदेह कुजलेल्या स्थितीतआढळून आला.

या व्यक्तीचा मृत्यूझाला वा त्याची हत्या करण्यातआली, ही बाब रहस्यमय बनली आहे.दुरंधी सुटेपर्यंत मृतदेह. तिथेचअसल्यामुळे ही घटना 13/12/2022 मंगळवारी उघडकीस आली. मृतदेह असलेल्याचेवय अंदाजे ५५ वर्षे असल्याचा
पोलिसांचा अंदाज आहे.

दोन-तीनदिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा,मृतदेह कुजल्यामुळे परिसरात दुर्गधी
सुटली होती. अखेर याची शहानिशाकेली असताना परिसरातीलनागरिकांना मृतदेह आढळला.

नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर मुल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत
शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत
आहेत.