सैनिक शाळा प्रवेश परीक्षेच्या अर्जप्रक्रियेला मुदत वाढ

98

ष्करात जाऊन देशसेवा करण्याचं स्वप्न बघणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील सैनिकी शाळांमध्ये (Sainik School) 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया (Admission Process) सुरू झालेली आहे.

अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेसाठी (AISSEE 2022) अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ६ वी आणि ९ वीच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2022 (AISSEE) साठी अर्ज जारी केले आहेत. इयत्ता 6 वी आणि 9  वी मध्ये प्रवेशासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थी अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा 2022 (The Sainik School Entrance Exam – 2022 – AISSEE)  राष्ट्रीय चाचणी एजन्सीव्दारे आयोजित केली जाईल. याकरिता अधिकृत वेबसाइटवर जाऊन पालक अर्ज दाखल करू शकतात.

उमेदवार AISSEE 2022 साठी केवळ aissee.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2022 (AISSEE) साठी अर्ज जारी केले आहेत. इयत्ता ६ वी आणि ९ वी मध्ये प्रवेशासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.