पॅनकार्डधारकांनी करा ‘हे’ काम, नाहीतर बसेल आर्थिक फटका

109

PAN Card Holders Alert : तुमच्याकडे पॅन कार्ड असेलच. कोणत्याही आर्थिक कामासाठी पॅन कार्ड गरजेचे असते. परंतु, आता आयटी विभागाने पॅनकार्डधारकांना इशारा दिला आहे. याला कारणही तसेच आहे.कारण अनेकांनी आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक केले नाही. आयटी विभागाने या लोकांना 31.03.2023 पर्यंत मुदत दिली आहे. यापूर्वी तुमचे कार्ड लिंक करून घ्या नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेल.

30 जूननंतर आधार कार्ड पॅनशी जोडलेल्यांना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 1000 रुपयांचा दंड ठोठावला होता आणि विलंब शुल्क भरल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्यांचे पॅन आधारशी लिंक करण्याची परवानगी दिली जाणार नाही. PAN आणि आधार 31 मार्च 2023 पर्यंत लिंक केले जाऊ शकतात.

होईल 10,000 पर्यंत दंड

जर तुम्ही पॅन कार्ड लिंक केले नाही तर ते 2023 मध्ये ते निष्क्रिय होईपर्यंत पॅन कार्ड वापरण्यास सक्षम असतील. यानंतर, पॅनकार्डधारकांना बँक खाती, म्युच्युअल फंड किंवा स्टॉक खाती उघडण्यासारख्या गोष्टी करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

त्याशिवाय तुम्ही लॉक केलेले पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरत असाल तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्काचा धोका पत्करावा लागेल. आयकर कायदा 1961 च्या कलम 272B अंतर्गत तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड होईल.

याबात इन्कम टॅक्स इंडियाने ट्विट केले आहे, ‘आयकर कायदा, 1961 नुसार, सवलत श्रेणीत न येणाऱ्या सर्व पॅन धारकांसाठी आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख 31.3.2023 आहे. जर पॅन आधारशी लिंक नसेल तर पॅन निष्क्रिय होईल. त्यामुळे उशीर करू नका, आजच लिंक करा!’

See more 

 

असे करा लिंक

  1. सर्वात अगोदर इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.
  2. त्यानंतर क्विक लिंक विभागात जाऊन आधार लिंक वर ा.
  3. तुमहाला एक नवीन विंडो दिसेल, तुमचा आधार तपशील, पॅन आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
  4. त्यातील ‘I validate my Aadhaar details’ हा पर्याय निवडा.
  5. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक OTP मिळेल. तो भरून ‘Validate’ वर ा.
  6. दंड भरल्यानंतर, तुमचे पॅन आधारशी लिंक केला जाईल.