इच्छुक उमेदवारांची निवडणूकि साठी नामनिर्देशन फाॅर्म कागदाची जुळवा जूळव मुल तालुका प्रशासन सज्ज

68

जात प्रमाणपत्र,नवीन पासबुक आणि अर्जासाठी धावाधाव,सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार

मुल :— उमेदवारी अर्ज दाखल करत असतानाच जात प्रमाणपत्र,नवीन पासबूक आणि अन्य महत्वपूर्ण दस्तऐवज मोलाचे ठरते. अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ काही तास शिल्लक असल्याने संपूर्ण बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी अखेरच्या क्षणाला उमेदवारांची दमछाक होत आहे.मुल तालुक्यातील एकूण सात ग्रामपंचायतीमध्ये प्रभागात जागांसाठी ग्रामपंचायत निवडणूकीचा मुकाबला रंगणार आहे.महिला उमेदवारााचे जे माहेर असले त्या जिल्हयातून त्या तालुक्यातून त्यांना जात प्रमाणपत्राची नोंदणी करावी लागत आहे.
अनुसू​चित जाती आणि नागरिकांचा मागासप्रवर्ग यांच्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असून अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र कार्यालय आहे.
जात प्रमाणपत्राची पोचपावती अर्जासोबत सादर करावयाची आहे.
सोबतच उमेदवारांनी बॅंकेत नवीन खाते उघडणे गरजेचे असून,निवडणुकीचा संपूर्ण खर्च या खात्यातूनच करावयाचा आहे.
मतमोजणी झाल्यापासून 30 दिवसांच्या आत खर्चाचा तपशील विहीत नमुन्यात उमेदवारांना सादर करावा लागेल.
निवडणूक संपली की,खाते बंद करता येईल,अवघे काही
तास शिल्लक असल्याने उमेदवारांची यासाठी धावधाव सुरू आहे.
अर्जासाठी स्वतंत्र कक्ष
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ग्रामपंचाय निहाय स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. यासाठी तीन निवडणूक निर्ण अधिकारी कर्तव्यावर आहेत.निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार यशवंत पवार
विनोद कुमार यशवंत वैद्य बोंडळा खुर्द,चकदुगाळा,रामचंद्र रंगरााव देशमूख गडीसूर्ला बेंबाळ,राहूल कोमावार उश्राळा चेक,आकापूर,बाबराळाया ग्रामपंचायतीसाठी नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी यांनी दिली.मुल तहसिल मधील ग्रामपंचायतीच्या रणसंग्राम :आज नामनिर्देशनचा अंतिम दिवसतालुक्यातील 7 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होउु घातली असून,त्या​करिता 28 नोंव्हेंबर पासून नामनिर्देशन भरण्यास सुरूवात झाली आहे. आज 2 डिसेंबर अंतिम मुदत असून,सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू आहे.इच्छूक उमेदवार नामनिर्देशन पासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढविण्यासाठी संधी मिळावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशन सादर करण्यासाठी वेळ वाढवून दिली आहे. त्यामुळे आज 2 डिसेंबर रोजी निवडणूक लढविणा—या इच्छूक उमेदवारांना सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पारंपारिक पध्दतीने (आॅफलाईन) नामनिर्देशन पत्र दाखला करता येणार आहे.5 डिसेंबरला अर्जाची छाननी करून 7 डिसेंबर ला अर्ज मागे घेता येणार आहे. 7 डिसेंबरलाच दुपार नंतर चिन्हाचे वाटप केले जाणार आहे.