मुल – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 132 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सोहळा व सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम मुल येथे सायं. 4.00 वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षा अ.भा. महात्मा फुले समता परिषद जिल्हा महिला कार्याध्यक्ष ,कवित्री सौ. शशिकला गावतुरे होत्या, प्रमुख मार्गदर्शक सुप्रसिद्ध वक्ते डॉ. समीर कदम सर महापुरुषांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सतत करीत असतात. याप्रसंगी त्यांच्या कार्याचा गौरव समता परिषदेच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह चिन्ह देऊन करण्यात आला. बहुजनांचा राजकीय ,सामाजिक शैक्षणिक ,सांस्कृतिक, औद्योगिक, व्यावसायिक, कृषी क्षेत्राचा विकास महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारानेच करता येतो, महापुरुषांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमातून आपण त्यांचे विचार आत्मसात करून प्रगती केली पाहिजे असे विचार प्रास्ताविकातून प्रा. विजय लोणबले यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर समीर कदम यांनी समाजाच्या उन्नतीसाठी महात्मा फुले यांचे सत्यशोधक आंदोलन प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे तसेच फुले दांपत्याने केलेले कष्ट व त्यागाची जगात तोड नाही त्यांच्या परिश्रमाचे चीज आपण केले पाहिजे महात्मा फुलेंचे विचार संपूर्ण मानव जातीला प्रेरणादायी आहेत, महिलांनी ज्योती सावित्री ला आदर्श मानून त्यांच्या विचार आत्मसात करून आपला प्रापंचिक विकास साधावा असे विचार आपल्या व्याख्यानातून पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. शशिकला गावतुरे यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून महिलांनी मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे,व सक्षम पणे उभे राहून कुटुंबाचा विकास साधावा असे मत व्यक्त केले, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रयत पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. निपचंद शेरकी, प्रा. डॉ. केवल कऱ्हाडे, श्री.नामदेवराव गावतुरे, श्री .वासुदेवराव गूरुनुले, श्री.श्रावणजी लोनबले.श्री. हेमंत सुपणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. किसन वासाडे, प्रा. दिलीप वारजुरकर, श्री. सुरेश सांगोजवार श्री जगदीश मोहुलें , प्रा. विजय काटकर ,प्रा. धनंजय चूधरी, प्रा. सागर माशिरकर, श्री. दुशांत महाडोळे, श्री. थामदेव रामटेके, श्री. गंगाधर ताकसांडे, डॉ. दीपक जोगदंड, सौ माधुरीताई गुरनुले , सौ अर्चना चावरे सौ. कल्पना वारजूरकर, सौ . वैशाली निकुरे, सौ. छाया गावतुरे, सौ. वर्षा लोनबले ,सौ. दुर्गा सहारे,सौ. उषा चुधरी, सौ. वर्षा कुनघाडकर, सौ. सुनीता बुरांडे, सौ. सुरेखा गभने सौ.जयश्री निकुरे, सौ.नीलम गावतुरे, सौ .सीमा लोणबले सौ. संगीता ढोले, तसेच ज्ञानज्योती महिला बचत गटाच्या सदस्या व समाज बांधव ,भगिनी, युवक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन समता परिषदेचे युवा कार्यकर्ते श्री. ओमदेव मोहुलें यांनी केले तर आभार प्रदर्शन समता परिषदेचे तालुकाध्यक्ष श्री. विक्रांत मोहुलें यांनी केले.