व्होटर कार्ड ऑनलाइन कसं डाउनलोड करायचं? जाणून घ्या

72
रकारी किंवा खासगी संस्थांमध्ये कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी ओळखपत्राची गरज लागते.
पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, पासपोर्ट, इलेक्ट्रिसिटी बिल आदी बाबी ओळखीचा किंवा रहिवासाचा पुरावा देतात. त्याचप्रमाणे, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदारांकडे स्वत:चं ओळखपत्र म्हणजेच व्होटर आयडी कार्ड असणं गरजेचं आहे. मतदाराच नाव मतदारयादीत असणंही आवश्यक असतं. मतदारयादीत नाव नसेल तर मतदान करता येत नाही. परंतु, नाव मतदारयादीत असेल आणि व्होटर आयडी कार्ड नसेल तर काळजीचं कारण नाही. निवडणूक आयोगाने मतदारांसाठी अगदी काही मिनिटांत व्होटर आयडी कार्ड मिळवून देण्याची सोय केली आहे. व्होटर आयडी कार्ड काढण्यासाठी काय करायचं याबद्दलची माहिती जाणून घेऊ. याबद्दल माहिती देणारं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलं आहे. सध्या गुजरात विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यातलं मतदान होईल. महाराष्ट्रातल्या काही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रियाही जाहीर झाली आहे.मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नाव मतदारयादीत असणं अत्यावश्यक आहे. मतदार यादीत नाव असूनही व्होटर आयडी कार्ड अर्थात मतदार ओळखपत्र नसणार्‍यांची संख्या नेहमीच खूप असते. यासाठी निवडणूक आयोगाने व्होटर कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे. पीडीएफ व्हर्जनला ई-एपिक (e-EPIC) असं म्हणतात. व्होटर कार्ड कसं डाउनलोड करावं हे जाणून घेऊ. निवडणूक आयोगातर्फे ई-एपिक डाउनलोड करण्याची सुविधा पुरवली जाते. ई-एपिक म्हणजे व्होटर कार्डचं पीडीएफ व्हर्जन. यामुळे मतदारांना आपलं व्होटर कार्ड आपल्या फोनमध्ये स्टोअर करता येतं. याशिवाय डिजिलॉकरवरही ई-एपिक कार्ड डाउनलोड करता येतं. तसंच या पीडीएफ कार्डची प्रिंट घेऊन तुम्ही लॅमिनेटही करू शकाल. व्होटर कार्ड डाउनलोड करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ.

व्होटर कार्ड डाउनलोड करण्यासाठीच्या स्टेप्स पुढीलप्रमाणे : 1. सगळ्यात पहिल्यांदा निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. https://voterportal.eci.gov.in किंवा https://nvsp.in/ 2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी स्वतःच्या नावाची नोंदणी एनव्हीएसपी पोर्टलवर करणं आवश्यक आहे. 3. नोंदणी केली नसेल, तर नोंदणी करा आणि मगच पुढे जा. 4. स्वत:ची मूलभूत माहिती देऊन अकाउंट रजिस्टर करू शकाल. 5. रजिस्ट्रेशनंतर एनव्हीएसपी पोर्टलवर लॉग इन करा. ज्यांचं रजिस्ट्रेशन यापूर्वीच झालं आहे, अशांनी थेट एनव्हीएसपी पोर्टलवर लॉग इन करावं. 6. यानंतर स्वत:च्या इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्डवरचा नंबर टाकून किंवा फॉर्म रेफरन्स नंबर टाकून राज्य सिलेक्ट करा. 7. तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी येईल. 8. ओटीपी टाकल्यावर व्होटर कार्ड डाउनलोड करण्याचा ऑप्शन तुम्हाला येईल. 9. ‘डाउनलोड ई-एपिक’वर क्लिक करा. 10. यानंतर व्होटर कार्डची पीडीएफ फाइल डाउनलोड होईल. 11. तुम्ही तुमचं ई-एपिक किंवा पीडीएफ स्वरूपातलं व्होटर कार्ड सेव्ह करू शकता किंवा त्याची प्रिंटही घेऊ शकता. याशिवाय मिळू शकेल आणखी काही लाभ डिजिटल व्होटर आयडी कार्डच्या या सेवेत डुप्लिकेट कार्ड मिळवणं, पत्ता बदलणं यासारख्या सेवांचाही लाभ मिळू शकेल. पत्ता बदलला असेल, तर काळजीचं कारण नाही. तुम्ही एनव्हीएसपी पोर्टलद्वारे पत्ता बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकाल. व्होटर कार्डमध्ये दिलेला पत्ता योग्य असेल, तर दुसर्‍यांदा व्होटर कार्ड डाउनलोड करता येतं.