पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

71
मुंबई, 29 नोव्हेंबर: राज्यातमहाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता रानातील तरुणांना पोलीस होण्याचा गोल्डन चान्स मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर उद्या म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत आर सादर करण्यातही मुदत देण्यात आली होती.

मात्र आता हे मुदत वाढवून 15 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं ट्विट केली आहे. राज्यात तब्बल अठरा हजार पोलिसांची भरतीची घोषणा झाल्यानंतर सर्व तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 9 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज [प्रक्रिया सुरु झाल्यापासून अनेक तरुणांनी अर्ज केले आहेत. मात्र काही दिवसांपासून उमेदवारांना फॉर्म भरण्यात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता.

त्यामुळे कोणाचा अर्धवट फॉर्म राहून जात होता तर कोणालाडॉक्युमेंट्सअपलोड कार्यात अडचणी येत होत्या. या सर्व गोष्टी लक्षात घेता ही मुदतवाढ देण्यात आली आहे.Maharashtra Police Bharti: फक्त डॉक्युमेंट्स नाहीत म्हणून रिजेक्ट होणं परवडणार नाही गड्यांनो; आताच रेडी ठेवा ही लिस्टकाय म्हंटलंय ट्विटमध्ये राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देणार आली आहे. तसंच आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

या निर्णयामुळे अनेक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. ज्या उमेदवरांचे कागदपत्र अडकले होते किंवा वेळेवर मिळाले नव्हते अशा उमेदवारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. तर ज्या उमेदवारांचे फॉर्म तांत्रिक अडचणींमुळे अडकले होते अशानाही दिलासा मिळाला आहे.

अशी असेल लेखी परीक्षा 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.

लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे.

परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.Maharashtra Police Bharti: 90 मिनिटांत ठरणार तरुणांचं भविष्य; 18,000 पदांसाठी असं असेल परीक्षेचं पॅटर्नअशी असेल शारीरिक चाचणी पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे.

यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील