महात्मा फुले स्मृतिदिना निमित्त अभिवादन

88

मुल – बहुजन समाजाला शिक्षणाचे धडे देणारे,चातुर्वरण्य व्ययस्थेविरुद्ध व जातिप्रथेविरुद्ध बंड करून बहुजन समाजात समता, बंधुता, स्वातंत्र्य वसामाजिक न्याय अशा मानवतावादी मूल्यांचे बीजारोपण करणारे, स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारे, पहिल्यांदा छत्रपती शिवाजीमहाराजांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती उत्सव साजरी करणारे आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे, शिक्षणतज्ज्ञ,उद्योजकथोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त क्रांती ज्योती नागरी सहकारी पतसंसथेच्या सभागृहात अभिवादनकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कायेक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाज बांधव माजी प्राचाये बंदुभाऊ गुरनुले, प्रमुख आंतेथी कृषी उत्पन्न बाजार
समितीचे संचालक, माजी पंचायत समिती सदस्य डॉ.पद्याकर लेनगुरे, माळी समाजातील उद्योजक हसन वाढई, प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचेसरचिटणीस शिक्षक गुरुदास चौधरी मान्यवर यांचे हस्ते क्रांती सूर्य महात्मा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन वमालारपण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. महात्मा फुलेवर विचार व्यक्‍त करतांना अध्यक्ष बंडूभाऊ गुरनुले यांनी म्हटले संघटन
मजबूत करण्यासाठी वेळेचे बंधन पाळणे अत्यावश्‍यक आहे. तसेच कुठलेही व्यसन असेल तर समाजाची प्रगती होऊ शकत नाही असे मार्मिकविचार उदाहरणादाखल सांगितले. तर प्रमुख अतिथी हसन वाढई यांनी समाजातील युवकांनी उद्योग व व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचीप्रसंगी समाजाची आर्थिक प्रगती सुधारावी असे मत व्यक्‍त केले. आणि डॉ.पद्याकर लेंनगुरे यांनीही महात्मा फुलेंचे विचार व शिक्षण ज्यांनी
स्वीकारले त्या समाजाची प्रगती झाली आहे. असे मार्गदर्शन केले. तर गुरुदास चौधरी यांनीही कार्ल मार्क्स चा उदाहरण देऊन समाजसंघटनेसाठी गर्दीची गरज नाही. काही ठराविक अनुभवी समाज बांधव एकत्र आले तरी संघटन मजबूत करता येते असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी महासंघाचे विभागीय महासचिव तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी केले असून पुढीलनियोजनाबाबत उपस्थितांशी चर्चा केली. कार्यक्रमाला युवा नेतृत्व राकेश ठाकरे, शिक्षक जितेंद्र लेनगुरे, शिक्षक किशोर वाढई, विवेक मांदाडे,
भाऊजी लेनगुरे, सूरज मांदाडे, पिंटू महाडोळे, संदीप वाढई, मनोज ठाकरे, आदी समाज बांधव उपस्थित होते. संचालन आर. टी गुरनुले यांनीकेले तर आभार युवा संघटनेचे ओमदेव मोहूर्ले यांनी मानले.