पोलिस भरतीचे संकेतस्थळ चालेना, उरले 2 दिवस,शहरात येऊनही सर्व्हर डाऊनची समस्या

97

पोलिस दलातील शिपाई व चालकांची राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)18331 जागा  पदे भरण्यासाठी ९ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र त्यासाठी सुरू करण्यात आलेले policerecruitment2022.mahait.org हे संकेतस्थळच चालत नसल्याने युवकांचे हाल होत आहेत.परिणामी ग्रामीण भागातील युवकांना भटकंती करावी लागत आहे. अर्जासाठी ३० नोव्हेंबरची मुदत आहे, अवघे सहा दिवस उरल्याने युवकांची घालमेल होत आहे.ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांना दररोज शहरातील सायबर कॅफेवर जावे लागते. सकाळपासूनच त्यासाठी युवकांची भटकंती सुरु होते. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा ग्रामीण भागात अद्याप काही ठिकाणी उपलब्ध नाही. तसेच काही ठिकाणी असल्यास अनेक ठिकाणी कित्येक तास विज नसते. त्यातच शहरात येऊनही सर्व्हर डाऊनची समस्या येत असल्याने गैरसोय वाढली.कॅफेचालकांनाही मनस्ताप ^वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने सायबर कॅफेचालकांनाही त्याचा फटका बसतो. अनेकदा उमेदवाराची ऑनलाइन माहिती निम्मे भरल्यावरही सर्व्हर अचानक डाऊन होते. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Total: 18331 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 पोलीस शिपाई 14956
2 चालक पोलीस शिपाई चालक 2174
3 राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) 1201
Total 18331

युनिट नुसार रिक्त जागा:

अ. क्र युनिट पद संख्या 
पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई चालक
1 बृहन्मुंबई 7076 994
2 ठाणे शहर 521 75
3 पुणे शहर 720 10
4 पिंपरी चिंचवड 216
5 मिरा भाईंदर 986
6 नागपूर शहर 308 121
7 नवी मुंबई 204
8 अमरावती शहर 20 21
9 सोलापूर शहर 98 73
10 लोहमार्ग मुंबई 620
11 ठाणे ग्रामीण 68 48
12 रायगड 272 06
13 पालघर 211 05
14 सिंधुदुर्ग 99 22
15 रत्नागिरी 131
16 नाशिक ग्रामीण 164 15
17 अहमदनगर 129 10
18 धुळे 42
19 कोल्हापूर 24
20 पुणे ग्रामीण 579 90
21 सातारा 145
22 सोलापूर ग्रामीण 26 28
23 औरंगाबाद ग्रामीण 39
24 नांदेड 155 30
25 परभणी 75
26 हिंगोली 21
27 नागपूर ग्रामीण 132 47
28 भंडारा 61 56
29 चंद्रपूर 194 81
30 वर्धा 90 36
31 गडचिरोली 348 160
32 गोंदिया 172 22
33 अमरावती ग्रामीण 156 41
34 अकोला 327 39
35 बुलढाणा 51
36 यवतमाळ 244 58
37 लोहमार्ग पुणे 124
38 लोहमार्ग औरंगाबाद 108
39 औरंगाबाद शहर 15
40 लातूर 29
41 वाशिम 14
42 लोहमार्ग नागपूर 28
राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)
1 पुणे SRPF 1 119
2 पुणे SRPF 2 46
3 नागपूर SRPF 4 54
4 दौंड SRPF 5 71
5 धुळे SRPF 6 59
6 दौंड SRPF 7 110
7 मुंबई SRPF 8 75
8 सोलापूर  SRPF 10 33
9 गोंदिया SRPF 15 40
10 कोल्हापूर SRPF 16 73
11 काटोल नागपूर SRPF 18 243
12 कुसडगाव अहमदनगर SRPF 19 278

शैक्षणिक पात्रता:

  1. पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  2. पोलीस शिपाई चालक: (i) इयत्ता 12वी उत्तीर्ण.  (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)
  3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.