रविवारी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फुट ओव्हरब्रिजचा एक भाग कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये १३ प्रवासी खाली पडले असून ६ जण ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना जवळच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, काझीपेट-पुणे एक्सप्रेस पकडण्यासाठी अनेक प्रवाशी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर जात होते. अचानक पुलाच्या मध्यभागाचा स्लॅब कोसळला आणि ६० फूट उंचीवरून हे प्रवासी थेट रुळावर पडले. यातील काही प्रवासी ओव्हरहेड वायरला धडकल्याने सांगितले जात आहे.