एफ .ई .एस.गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथे संविधान दिन कार्यक्रम संपन्न

88

नेहरू युवा केंद्र, चंद्रपुर व स्थानिक एफ. ई. एस. गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने एफ.ई.एस. गर्ल्स महाविद्यालयात संविधान दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विचार मंचावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ मिनाक्षी ठोंबरे, डॉ.सत्यपाल कातकर, प्रा.डॉ.अंजली ठेपाले, नेहरू युवा केंद्र चंद्रपुर येथील अधिकारी समशेर सुभेदार, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे, प्रा डॉ कल्पना कावऴे,प्रा.कुरेशी मॅडम, सामाजिक कार्यकर्ता कुरेशी सर,देवतळे यांची प्रामुख्याने विचारमंचावर उपस्थिती होती

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ मिनाक्षी ठोंबरे यानी विद्यार्थिनीना सविधानाचे महत्व सांगुण संविधान आपण सवा॔नी एकदा वाचावे अशाप्रकारचे विचार व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि तथा मार्गदर्शक प्रा. डॉ. सत्यपाल कातकर यानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना संविधान लिहताना आलेल्या अडचनी याचा उल्लेख करुण संविधान मधील विविध कलमा चा करुण त्याचे महत्व सांगितले तर प्रा.डाॅ.अजंली ठेपाले यानी संविधानाच्या उद्देश पत्रिके बाबतची माहिती दिलीकार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली
प्रा .डॉ .मेघमाला मेश्राम यानी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करुण उपस्थिताना संविधानाची शपथ दिली.संविधान दिन या कार्यक्रम प्रसंगी प्रा.कूरेशी मॅडम यानी संविधाना विषय क्वीज घेऊन विजेता रासेयो स्वयंसेवीकाना पाहुण्याच्या हस्ते गिफ्ट देण्यात आले.संविधान दिन या कार्यक्रमाची प्रास्ताविक समशेर सुभेदार नेहरू युवा केंद्र अधिकारी चंद्रपुर यानी केले सुत्र संचालन प्रा डॉ कल्पना कावऴे मॅडम तर आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे यानी केले
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कमर्चारी व मोठयासंख्येने रासेयो स्वयंसेवीका यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्या करीता दरवे, नथ्थु कामडी,बंडु वरवाडे, रमेश गुरुनूले यांचे मोलाचे सहकार्य लाभले .