मुल शहरात ठिकठिकाणी संविधान दिन उत्साहात

77

मुल शहरात विविध शाळा,महाविद्यालय,तसेच शासकीय कार्यालयामध्ये,संविधान चौकात संविधान प्रास्ताविकेचे वाचन,

संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले

मूल येथील शासकिय आदिवासी मुलांचे वस्तीगृहात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान प्रास्ताविकेचे यावेळी वाचन करण्यात आले.आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपुर अंतर्गत शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगुह मुल येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख मागदर्शक म्हणुन वसतिगृहाचे गृहपाल गजेंद्र प्रधान, कर्मचारी रत्ना पारखी, संदिप पारचे आदी कर्मचारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे उपस्थित पाहुण्यांनी संविधानाविषयी माहिती विशद केली. विद्यार्थ्यांनी सुद्धा संविधान दिनाबाबत भाषण दिले. यावेळी वस्तिगृहातील विद्यार्थी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

संविधान चौकात संविधान प्रास्ताविकेचे वाचन

मूल (प्रतिनिधी) : लिखित राज्यघटना म्हणून भारतीय संविधानाचा उल्लेख होतो.
भारतीय संविधान सर्वांना समानता, न्याय, बंधुत्वाची शिकवण देते. मुल येथील प्रशासकिय भवन परिसरातील
संविधान चौकात संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी मूल नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी सभापती मिलिंद खोब्रागडे, पब्लीक पंचनामाचे संपादक विजय सिद्धावार, सामाजिक कार्यकर्ते मोतीराम वाघमारे यांचे उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी जोशना गोहणे, सचिन वाकडे, गौरव शामकुळे, रवी बरडे, शुभम मानकर, अमित राऊत,
अनिकेत बुग्णावार, स्नेहल गेडाम, संजय मोहुर्ले यांनी सहकार्य केले.

कर्मवीर महाविधद्यालय मूल येथे संविधान दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते चंदू पाटील मारकवार यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचे संविधान लिहीतांना अनंत परिश्रम घेतले व संविधान दोन वर्ष, अकरा महिने, अठरा दिवस सातत्यपूर्ण प्रयासाने लिहून पूर्ण केले. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान लिहून तयार झाले, आणि 26 जानेवारी 1950 ला आपल्या संविधानाची अंमलबजावणी झाली.व्यक्ती श्रीमंत असो की गरीब संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहे. राष्ट्रपती असेल तरी एकच मत, सामान्य माणूस असेल तरी एकच मत!भारताचे संविधान म्हणजे एक पवित्र ग्रंथ आहे. संविधान वाचणे नितांत गरजेचे आहे. निवडणुकीत आम्ही कुठला प्रतिनिधी संभागृहात निवडून पाठवतो त्यावर या देशाचे भविष्य अवलंबून आहे. विद्यार्थ्यानी वाचण्याबरोबर आपल्या आकलनाचा स्तर उंचावला पाहिजे. मायबोली, गावबोली जरी आमची भाषा असली तरी भाषेला अद्यायावत करणे गरजेचे आहे. 

मी बाराव्या वर्गापासून शिक्षणाकडे पाठ फिरविली. त्याचे कारण म्हणजे न्यूनगंड म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीच्या आड येऊ देता कामा नये. संविधानात जात, पात, धर्म, पंथ, लिंगभेद याला काहीही महत्व नाही. आपण माणुसकीचा दृष्टिकोन जोपासला पाहिजे. जुन्या रूढी, परंपरांना मुठमाती दिली पाहिजे. देश घडवायचा असेल तर आम्हाला स्वतः ला घडविले पाहिजे. डॉ. आंबेडकर दिव्याखाली अभ्यास करीत होते. अभ्यासाचे महत्व अनन्यसाधारण आहे. डॉ. राजेंद्र भारूड (आय. ए. एस.)यांचे उदाहरण देतांना त्यांनी गरिबीवर मात करून आपले स्वप्न कसे पूर्ण केले हे स्पष्ट केले. संविधान आमच्या साठी आहे म्हणून संविधानाचे वाचन केलेच पाहिजे. याचा प्रण आम्ही संविधान दिनी केला पाहिजे. संविधान रक्षण करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. भाषणाप्रसंगी त्यांनी संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा उल्लेख केला. देव, मंदिर, धर्म या बाबी आपल्या वयक्तिक जरी असल्या तरी आमच्यासाठी खरे मंदिर संविधान आहे. जिथे आमच्या प्रगतीच्या दिशा आणि मार्ग आहेत. गाडगे महाराजांचं उदाहरण देतांना त्यांनी सांगितले की, गाडगे महाराजांचा पुत्र मरण पावला त्यांनी अश्रू गाळले नाहीत. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महापरिनिर्वाणाची बातमी कळताच ते ढसा ढसा रडले, कारण त्यांना माहित होतं की बाबासाहेबांनी जे आपल्या देशाला दिले ते पिढ्यानं पिढ्या साठी न फिटल्या जाणारे उपकार आहेत. याप्रसंगी प्रा. प्रवीण उपरे यांनी संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन केले. संजय कुंटावार, उपसरपंच, बोरचांदली यांनी आपले समर्पक विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्राचार्या डॉ. अनिता वाळके होत्या तर डॉ. जेस डेझा, प्रा. गजानन घुमडे, डॉ. उज्वला हांडेकर आणि विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.