ट्रकची धडक बसून शाळकरी विद्यार्थीनी गंभीर जखमी…

89

मूल : विज्ञान प्रयोगाचे साहित्यघेऊन सायकलने रस्ता ओलांडणाऱ्या एकाशाळकरी मुलीस सिमेंटने भरलेल्या ट्रकने
धडक दिली. ही घटना रविवारी (ता. २०)दुपारी दीड वाजताच्या सुमारास येथील मॉदुर्गा माता मंदिराच्या समोर घडली.याप्रकरणीट्रक चालकास अटक करण्यात आली आहे.येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक
उपचार करून जखमी मुलीस चंद्रपूर येथीलजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखलकरण्यात आले आहे. जखमी मुलीचे नावदिव्या पांडुरंग ठाकरे (वय १४ रा. चिचोली)असे आहे.ती येथील बाल विकास शाळेची
वर्ग आठवीची विद्यार्थी आहे. बालविकास शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजनकरण्यात आले आहे.त्यासाठी दिव्या
सायकलने आपल्या चिचोली या गावावरूननातेवाईकासोबत मुलला आली होती.मुलींचा एक गट विज्ञान प्रयोग बनविणार
होते.त्यासाठी मयूरी नामक वर्ग मैत्रीणीच्याघरून तीन चार मुली प्रयोगासाठी लागणारेकाही इलेक्ट्रिकचे सामान आणण्यासाठीदुकानात गेल्या होत्या.ते सामान घेऊन येतअसताना दिव्याच्या सायकलला चंद्रपूरमार्गाने ब्रह्मपुरीकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्याएम एच ३४ बीझेड ११६१ या क्रमांकाच्याट्रकची धडक बसली.त्यात ती गंभीर जखमी झाली. तिच्याडोक्याला गंभीर इजा झाली असून पायालाहीमार बसला आहे.मूल येथील उपजिल्हारूणालयात प्राथमिक उपचार करून तिलाचंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेआहे.याप्रकरणी ट्रक चालक मुकेश विलास
सोयाम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखळ करूनअटक करण्यात आली आहे. याबाबतचीतक्रार पांडुरंग ठाकरे यांनी मूल पोलिस ठाण्यात नोंदविली आहे.