मूल तालुक्‍यातील जानाळा शेतशिंवाराजवळील वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

83

वनविकास महामंडळाच्या हद्दीतील घटना मूल : कापूस काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करुन जागीच ठार केले. ही घटना मूल तालुक्‍यातील
जानाळा शेतशिंवाराजवळील वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. 523 मध्ये मंगळवारी दुपारी 3 वाजता दरम्यान
घडली. श्रीमती कल्पणा अरुणा लोनबले वय 45 वर्षे रा. कांतापेठ असे वाघाच्या हल्लात ठार आलेल्या महिलेचे
नांव आहे. तालुक्‍यातील मौजा कांतापेठ येथील श्रीमती कल्पणा अरुण लोनबले हया शेतावर कापुस काढण्यासाठी
गेल्या होत्या. दरम्यान दबा धरुन बसलेल्या वाघाने कल्पनावर हल्ला करुन जागीच ठार केले व पार्थिव फरफटत
नेले.ज्याठिकाणी मृतदेह सापडला ते ठिकाण वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. 523 मध्ये येते. सदर घटनेची
माहिती होताच वनविकास महामंडळाचे सहा. व्यवस्थापक खामकर, वनपरिक्षेत्राधिकारी पिंजारी, मूल पोलीस
स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत, क्षेत्र सहा. राकेश कुमरे घटनास्थळी दाखल होवुन शव उत्तरीय
तपासणीकरीता मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.