20 नोव्हेम्बर ला कन्नामवार सभागृहात आदिवासी सांस्कृतिक महोत्सव तथा आदिवासी वरवधू परिचय मेळावा

105

क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या शहादत आणि क्रांतीसुर्य भगवान बिरासा मुंडा जयंती दिनाचे औचित्य साधुन मूल, ता. मूल जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र राज्य येथे 20 नोव्हेम्बर 2022 ला स्थानिक कन्नामवार सभागृहात आदिवासी सांस्कृतिक महोत्सव तथा आदिवासी वरवधू परिचय मेळावा समस्त आदिवासी समाज तालुका मूल, पुरुष बचतगट महिला बचत गट, युवक मंडळ यांनी आयोजित केला आहे, तरी आपण सर्व आमंत्रित आहात.
या सांस्कृतिक महोत्सवात समस्त आदिवासी जमातींच्या संस्कृती चे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करणार असून त्यासाठी आपणा सर्वांची मदत हवी आहे. बोलीभाषा जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे. बोलीभाषातुन गीत आणि जमातीचे वैशिष्ट्ये सादर करणे तसेच पारंपरिक नृत्य सादर करणे वाद्याची ओळख आणि विविध कार्यक्रम प्रसंगी वाजवले जाणारे वाद्यावरील ताल, यांचे सादरीकरण करण्यात येत आहे. आपल्या जमातीत असे कला जोपासणारे असेल तर कळवावे, त्यांना येण्याजाण्याचा खर्च देण्यात येईल, ढेमसा, रेला, घुसाडी वगरे जे नृत्य आहे त्यांना या कार्यक्रमात सहभाग घेता येईल,उपस्थित कलाकारामधून आपल्या संस्कृतीचे दर्शन इतर जमातीला करता येईल, यामुळे समाज एकत्र जोडल्या जाईल. तसेच सत्कारास पात्र असलेला एखाद्या अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता यांचा सत्कार झाला पाहिजे असं असेल तर त्यांचे नाव सुचवा.
आयोजित कार्यक्रमात आदिवासी मधील विविध जमातीतील युवक,युवतींनी मोठ्या संख्येने वरवधू परिचय मेळाव्यात सहभागी व्हावे. सर्व जमातीचे मुलं मुली. दूर असलेल्यासाठी सुविधा आहे त्यांनि परिचयाचा व्हिडीओ पाठवा 9049093137 वर तसेच मॅसेज सारखा टाईप करून बायोडाटा आणि फोटो टाका. सर्वांनी बायोडाटा व फोटो टाकणे अनिवार्य आहे. पुनरविवाहसाठी प्रयत्न केले जाणार्यानीही यात सहभाग घ्यावा.
आपली संस्कृती, रूढी ,परंपरा टिकवून ठेवन्या करिता स्वतः आयोजक समजून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.