शिबिर: 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांचे आधारकार्ड; मारोडा,राजोली,बेंबाळ,भेजगाव,चिरोली,मुल,आधारकार्ड काढण्यासाठी शिबिर

65

आधार कार्ड हे भारताचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. नवजात मुलांसह या देशातील नागरिकांसाठी ओळख आणि पत्त्याचा पुरावा मानला जातो. यूआयडीएआय (भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण) ने पालकांना नवजात मुलांच्या आधार कार्ड अर्जासाठी ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी वेगळे आहेत नियमया प्रक्रियेतील काही नियम लहान मुलांना लागू होत नाही.

उदाहरणार्थ, पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बायोमेट्रिक डेटा आवश्यक नाही. अशात, पालकांची लोकसंख्या शास्त्रविषयक माहिती आणि चित्राच्या आधारे आधारवर प्रक्रिया केली जाईल आणि प्रमाणित केले जाईल. परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा ते पाच वर्षांचे होतील तेव्हा त्यांना बायोमेट्रिक माहिती जसे की फिंगरप्रिंट्स इत्यादी नोंदणीसह नोंदणी करणे आवश्यक आहे.

मुल तालुक्यातील मारोडा,राजोली,बेंबाळ,भेजगाव,चिरोली,मुल  येथे ० ते 6 वर्षे वयोगटातील बालकांचे आधारकार्ड काढण्यासाठी मोफत शिबिर दिनांक 14 नोव्हेंबर 2022  बालविकास प्रकल्प कार्यालय व येथील महाआयटी चंद्रपूर ,मुल तालुक्यातील आधारकेंन्द्र अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. 

आवश्यक कागदपत्रं  :—जन्म प्रमाणपत्र , जन्म प्रमाणपत्र नसल्यास आधार प्रमाणपत्र ,आई किंवा वडिलांचे आधार कार्ड (आधार नोंदणीच्या वेळेस हजार असेल त्यांचे) ,आई किंवा वडिलांच्या आधार कार्ड मधील पत्ता सारखा नसल्यास सेल्फ डीक्लेरेशन प्रमाणपत्र (एचओएफ)आधार शिबिरात केवळ 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे आधार नोंदणी करण्यात यावी.नवीन आधार साठी कोणतेही शुल्क आकारू नयेआधार फार्म साठी कोणतेही शुल्क आकारू नये.

आई किंवा वडिलांच्या आधार कार्ड मधील पत्ता सारखा नसल्यास सेलफ डीक्लेरशन प्रमाणपत्र भरून आधार नोंदणी करावी.जन्म प्रमाणपत्र नसल्यास आधार प्रमाणपत्र भरून आधार नोंदणी करावी महिला व बाल विकास अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी,पर्यवेक्षक /सेवीका हयांनी आधार नोंदणी शिबीराबाबत सुचना देऊन एकही बालक आधार नोंदणीपासून वंचीत राहणार नाही यांची दक्षता घेण्याबाबत प्रसिध्दी पत्राकाव्दारे प्रशासनाने कळविले आहे.