चिखली येथील नागरीकांनी अनुभवला ‘डे—नाईट’ क्रिकेटचा रोमांच क्रिकेटचा महोत्सव

67

न्यू एकता क्रिकेट मंडळ चिखली तालुका मुल जिल्हा चंद्रपूर द्वारा आयोजित भव्य खुले अंडरआर्म डे – नाईट क्रिकेट सामने दिनांक 11 नोव्हेंबर 2022 स्थळ दुमाजी पाटील मंडलवार यांच्या भव्यआवारामध्ये क्रिकेट सामन्याचे उद्घाटन कार्यक्रम पार पाडण्यात आला या कार्यक्रमाकरिता उद्घाटक म्हणून गुरु भाऊ गुरनुले तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मुल, तसेच अध्यक्ष म्हणून संदीप भाऊ कारमवार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मुल, कार्यक्रमाचे उपाध्यक्ष श्री दुर्वास कळसकर उपसरपंच ग्रामपंचायत चिखली, श्री लहुजी कळस्कर ग्रामपंचायत सदस्य चिखली, श्री संजय गेडाम माजी उपसरपंच चिखली, डोपाजी पाटील कळस्कर गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष चिखली, बबन कळस्कर तंटामुक्ती अध्यक्ष चिखली, पुनम ताई मडावी पोलीस पाटील चिखली, राकेश जोलमवार ग्रामपंचायत सदस्य चिखली, पंकज कळस्कर ग्रामपंचायत सदस्य चिखली, न्यू एकता मंडळ चे अध्यक्ष व सर्व सदस्य चिखली भाषेत काम करीत सर्व उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संचालन राकेश कळस्कर यांनी केले तर प्रास्ताविक पर भाषण मनोज कोवे, आणि आभार प्रदर्शन मंडळाचे सदस्य मधुकर कळसकर यांनी केले