उद्यापासूनच ‘ही’ प्रक्रिया पोलीस भरतीतला अडथळा दूर, राज्यात 18 हजारांपेक्षा जास्त पदांची भरती

24

राज्यातील तरुणांसाठी (Maharashtra Youth) आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून काहीदिवसांपूर्वीपोलीस भरती ( Police Recruitment ) जाहीर करण्यात आली होती.

मात्र काही कारणास्तव ती स्थगित झाली होती. आता ही प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्यातील अनेक वृत्तपत्रांतून यासंबंधीची जाहिरात (Police Recruitment advertisement) प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता सुमारे 18 हजार331 पदांवरील पोलीस भरती सुरू होणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली आहे. 9 नोव्हेंबरपासूनच पोलीस भरतीसाठी उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यानंतर आधी शारीरीक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा अर्ज भरला, अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का, असा प्रश्न होता. गृहविभागाने या उमेदवारांकरिता मोठा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांना पोलीस भरतीची संधी देण्याचा निरणय राज्य सरकारने घेतला आहे.

म्हणजेच कोरोना काळात अर्ज केलेल्या आणि ज्यांची वयोमर्यादा समाप्त झाली आहे, अशा उमेदवारांना पोलीस भरतीत संधी मिळणार आहे.

राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील सन- २०२१ पर्यंत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई/ पोलीस शिपाई चालक/ सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण १८३३१ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे.

विविध घटकातील एकूण १८३३१ जागा
पोलीस आयुक्त कार्यालय, बृहन्मुंबई- ६७४० जागा,  ठाणे (शहर)- ५२१ जागा, पुणे (शहर)- ७२० जागा, पिंपरी चिंचवड- २१६ जागा, मीरा भाईंदर- ९६८ जागा, नागपूर (शहर)- ३०८ जागा, नवी मुंबई- २०४ जागा, अमरावती (शहर)- २० जागा, सोलापूर (शहर)- ९८ जागा, मुंबई (लोहमार्ग)- ६२० जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय– ठाणे (ग्रामीण)- ६८ जागा, रायगड- २७२ जागा, पालघर- २११ जागा, सिंधुदुर्ग- ९९ जागा, रत्नागिरी- १३१ जागा, नाशिक (ग्रामीण)- ४५४ जागा, अहमदनगर- १२९ जागा, धुळे- ४२ जागा, कोल्हापूर- २४ जागा, पुणे (ग्रामीण)- ५७९ जागा, सातारा- १४५ जागा, सोलापूर (ग्रामीण)- २६ जागा, औरंगाबाद (ग्रामीण)- ३९ जागा, नांदेड- १५५ जागा, परभणी- ७५ जागा, हिंगोली- २१ जागा, नागपूर (ग्रामीण)- १३२ जागा, भंडारा- ६१ जागा, चंद्रपूर- १९४ जागा, वर्धा- ९० जागा, गडचिरोली- ३४८ जागा, गोंदिया- १७२ जागा, अमरावती (ग्रामीण)- १५६ जागा, अकोला- ३२७ जागा, बुलढाणा- ५१ जागा, यवतमाळ- २४४ जागा, पुणे (लोहमार्ग)- १२४ जागा, औरंगाबाद (लोहमार्ग)- १५४ जागा

राज्य राखीव दल, गट क्र.१, पुणे- ११९ जागा, गट क्र.२, पुणे- ४६ जागा, गट क्र.४, नागपूर- ५४, गट क्र.५, दौंड- ७१ जागा, गट क्र.६, धुळे- ५९ जागा, गट क्र.७, दौंड- ११० जागा, गट क्र.८, मुंबई- ७५ जागा, गट क्र.१०, सोलापूर- ३३ जागा, गट क्र.१५, गोंदिया- ४० जागा, गट क्र.१६, कोल्हापूर- ७३ जागा, गट क्र.१८, उदेगाव (अकोला)- २४३ जागा, गट क्र.१९, कुसडगाव (अहमदनगर)- २७८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता बारावी (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा. (सविस्तर शैक्षणिक/ शारीरिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ४५०/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३५०/- रुपये फीस आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.