60 वर्ष वयानंतर मिळेल दरमहा 3 हजार रुपये पेन्शन,पीएम किसान मानधन योजनेचा लाभ

98

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे. ही योजना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. या योजनेचे लाभार्थी शेतकरी देखील पीएम मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतात.

देशातील वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत, 60 वर्षांनंतर लाभार्थ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जातील. त्यानुसार वृद्ध शेतकऱ्यांना वार्षिक 36 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ 18 वर्षांवरील तरुणांपासून 40 वर्षांपर्यंतचे शेतकरी यांना घेता येईल. पेन्शन मिळवण्यासाठी त्यांना त्यांच्या वयानुसार दर महिन्याला या योजनेत पैसे जमा करावे लागतील.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन दिली जाते. तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर PM किसान मानधन योजनेला तुमची नोंदणी आपोआप होते. या योजनेचा प्रीमियम सन्मान निधी अंतर्गत मिळालेल्या रकमेतून कापला जातो. पण हे करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो.

पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशातून प्रीमियम भरावा लागतो. त्याच्या प्रीमियमची रक्कम 55 ते 200 रुपयांपर्यंत आहे. वयाच्या ६० व्या वर्षांनंतर, प्रीमियमचे पैसे कापून घेणे बंद होते आणि शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळू लागते. किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑनलाइन नोंदणी करू शकता.

तुम्हाला ऑफलाइन नोंदणी करायची असेल, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट द्यावी लागेल. तेथे तुम्हाला विनंती केलेली कागदपत्रे जमा करावी लागतील. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी तुम्ही maandhan.in वर जा आणि त्यानंतर तिथे स्व-नोंदणी करा. येथे तुमच्याकडून मोबाईल नंबर, ओटीपी इत्यादींची माहिती घेतली जाईल.