पोलीस भरतीच्या कमाल वयोमर्यादेत शिथिलता, ‘या’ उमेदवारांना होणार मोठा फायदा

134
मुंबई, 04 नोव्हेंबर: राज्यात शिंदे- फडणवीस सरकारडून काही दिवसांआधी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनतर लगेचच काही तांत्रिक मुद्दा समोर आल्यामुळे ही भरतो पोस्टपोन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती.

मात्र नक्की कशामुळे ही भरती थांबवण्यात आली आहे याबद्दल काही स्पष्टता नव्हती. मात्र आता हा तांत्रिक मुद्दा दूर झाला आहे आणि राज्यात पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा असलेल्या पोलीस भरतीमध्ये हजारो रिक्त पदे भरण्यात येणार होती. मात्र कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का यावर प्रश्नचिन्ह होतं.

अशा उमेदवारांनी सरकारकडे दादही मागितली होती. त्यामुळेच आता सरकारनं आणि गृहविभागाने मोठा निर्णय घेत अशा उमेदवारांना पोलीस भरतीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.असे उमेदवार ज्यांनी कोरोना काळात फॉर्म भरले आहेत त्यांची वयोमर्यादा समाप्त झाली होती.त्यामुळे ते परीक्षेला बसण्यासाठी पात्र नव्हते. अंतर आता अशा उमेदवारांच्या वयोमर्यादेत शिथिलता आणण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. त्यामुळे या सर्वच उमेदवारांना आता पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे. तसंच यामुळे पोलीस भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. या ठिकाणी भरल्या जाणार जागा मुंबई – 6740, ठाणे शहर – 521, पुणे शहर – 720, पिंपरी चिंचवड – 216, मिरा भाईंदर – 986, नागपूर शहर – 308, नवी मुंबई – 204, अमरावती शहर – 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई – 620, ठाणे ग्रामीण – 68, रायगड -272, पालघर – 211, सिंधूदुर्ग – 99, रत्नागिरी – 131, नाशिक ग्रामीण – 454, अहमदनगर – 129, धुळे – 42, कोल्हापूर – 24, पुणे ग्रामीण – 579, सातारा – 145, सोलापूर ग्रामीण – 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड – 155, परभणी – 75, हिंगोली – 21, नागपूर ग्रामीण – 132, भंडारा – 61, चंद्रपूर – 194, वर्धा – 90, गडचिरोली – 348, गोंदिया – 172, अमरावती ग्रामीण – 156, अकोला – 327, बुलढाणा – 51, यवतमाळ – 244, लोहमार्ग पुणे – 124, लोहमार्ग औरंगाबाद -154, एकूण – 14956कोणत्या प्रवर्गाला किती जागा? अनुसूचित जाती – 1811, अनुसूचित जमाती – 1350, विमुक्त जाती (अ) – 426, भटक्या जमाती (ब) – 374, भटक्या जमाती (क) -473, भटक्या जमाती (ड) – 292, विमुक्त मागास प्रवर्ग – 292, इतर मागास वर्ग – 2926 इडब्लूएस – 1544, खुला – 5468 जागा, एकूण – 1495

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (Maharashtra Government) सरकारने राज्यातील तरुणांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पोलीस भरतीतील (Maharashtra Police Recruitment) वयोमर्यादेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील इच्छूक तरुणांच्या पोलीस होण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत. राज्य सरकारने पोलीस भरतीच्या कमाल वयोमर्यादेत (Maharashtra Police Recruitment Age Limit) वाढ केली आहे. यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छूक असलेल्या तरुण-तरुणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (maharashtra government incresed police Recruitment age limit castwise)

1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत, ज्या उमेदवारांची वयाची कमाल मर्यादा पूर्ण झालीय, अशा सर्व प्रवर्गातील उमेदवारांना या निर्णयामुळे एक संधी मिळणार आहे. 2021 आणि 21 या वर्षातील रिक्त पदं भरण्यासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी एकवेळची उपाययोजना म्हणून हे उमेदवार पात्र असतील.

पोलीस भरतीसाठी राज्य सरकार प्रवर्गानुसार कमाल वयाची अट ठरवते. वयाची अट पूर्ण झाल्यानंतर इच्छूक उमेदवार भरतीच्या स्पर्धेतून आपोआप बाहेर होतो. कोरोनामध्ये 2 वर्ष सर्वकाही बंद होतं. त्यामुळे शासकीय नोकरभरती आणि पोलीस भरतीही होऊ शकली नाही. तसेच राज्य लोकसेवा आयोगाने याआधीच वयोमर्यादेत वाढ केली होती. त्यामुळे पोलीस शिपाई भरतीसाठीही वयाच्या मर्यादेत वाढ करावी, अशी तरुणांची मागणी होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली. त्यामुळे निवडक तरुणांना पोलीस होण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

दरम्यान राज्यात आठवड्याभरात 18 हजारा जागांसाठी पोलीस पदभरती करणार असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी 3 नोव्हेंबरला दिली.