मुल येथील अभियंता प्रकाश मडावी पीएचडी पात्रता परीक्षा पास

115

मूल : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत घेण्यात आलेल्या पीएचडी पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला, त्यात मूल येथील प्रकाश मडावी यांनी  कायदा विषयात पात्र झालेले आहेत.
आदिवासी समाजातील गरीब कुटुंबा मधून स्वकर्तृत्वाने परिस्थितीवर मात करून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आणि त्यांनी पंचायत समितीमध्ये अभियंता पदावर नोकरी मिळवली. अभियंता पदाची नोकरी सांभाळून त्यांनी आपले धेय्य साघ्य करण्याकरिता पुढील शिक्षणाची जिद्द उराशी बाळगून ते कायदा या विषयात २०२२ मध्ये पीएचडी पात्र ठरले. त्याबद्दल समाजातील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका मूल,सर्व सामाजिक संघटना व इतरही मित्रमंडळी, सहकारी अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. सर्व स्तरांमधून त्यांची प्रशंक्षा केली जात आहे म्हणतात ना ध्येय प्रबळ असतील तर आकाशाला ही गवसणी घालता येतो. ही म्हण त्यांनी सार्थ करून दाखविली.