मुख्याधिका-यांचा अभिनव उपक्रमाचे नागरीकांकडून स्वागत,बांधकामाच्या ना हरकत प्रमाणपञासाठी विशेष शिबीराचे आयोजन,

147

मूल (प्रतिनिधी) ना हरकत प्रमाणपत्रा अभावी बांधकाम करू शकत नसलेल्या नागरीकांना सहकार्य होऊन नगर परिषदेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून मुख्याधिकारी यांनी विशेष शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतल्याने बांधकामच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
बांधकामासाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी कित्येक महिण्यांपासून आँनलाईन अर्ज करूनही नगर परिषदेकडून अर्जाचा निपटारा होत नसल्याने अनेक बांधकाम खोळंबुन आहेत. यामूळे नगर परिषदे सोबतचं बांधकाम करण्यास इच्छुक असलेल्या नागरीकांचेही मोठया प्रमाणांत आर्थिक नुकसान होत असल्याच्या  मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी दखल घेतली असून ना हरकत प्रमाणपत्राच्या प्रतिक्षेत असलेल्या शहरवासीयांना सहकार्य करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम विभागाचे अभियंता सध्या रजेवर आहेत. रजेवरून सेवेत रूजू झाल्यानंतर दर आठवडयाच्या प्रत्येक सोमवार आणि मंगळवारला दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत नगर परिषदेच्या बांधकाम विभागात ना हरकत प्रमाणपत्रासंबंधी विशेष शिबीर होणार आहे. नगर परिषदेच्या ना हरकत प्रमाणपत्राच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरीकांनी नियोजीत दिवशी व वेळेत आँर्किटेक्ट व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. असे आवाहन मुख्याधिकारी पाटणकर यांनी केले आहे. नागरीकांची अडचण आणि ना हरकत प्रमाणपत्रामूळे होत असलेले नगर परिषदेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी विशेष शिबिर आयोजीत करण्याचा निर्णय घेतल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. नागरीकांच्या अनेक समस्या नगर परिषदेच्या विविध विभागात निकालाविना खोळंबुन आहेत. खोळंबुन असलेल्या त्याही समस्या मार्गी लावून जनतेला दिलासा देण्यासाठीही मुख्याधिकारी पाटणकर यांनी उपक्रम हाती घ्यावा. अशी अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली आहे.