रब्बी हंगाम 2022 करिता शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे गहू ,रब्बी ज्वारी,करडई 

107

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन 2022-23 अंतर्गत रब्बी हंगामामध्ये हरभरा या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण.दहा वर्षा आतील वाण या घटकाअंतर्गत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बीज निगम लि. कृषक भारती को ऑप या बियाणे वितरण संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे.या अनुदानावरील बियाण्याचा लाभ घेण्यासाठी 21 ऑक्टोबर 2022 महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून कृषी सहाय्यक मार्फत परमिट देण्यात येत आहे. प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे, महामंडळ राष्ट्रीय बीज निगम व कृषक भारती को.ऑप यांच्या वितरकांकडे परमिट देऊन अनुदान वगळता उर्वरित रक्कम देऊन हरभरा बियाणे खरेदी करावे.

मिळणार अनुदान

या बियाणास 25 रूपये प्रती किलो अनुदान देण्यात येते.तसेच हरभरा ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत प्रती शेतकरी एक एकर मर्यादेत अनुदानावर बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे.यामध्ये 10 वर्षाआतील वाणास (राज विजय -202.फुले विक्रम.फुले विक्रांत, एकेजी -1109 पिडीकेव्ही कांचन बीजी -3062 पुसा पार्वती, बीजीएम-10216 पुसा ) रुपये 25 प्रती किलो व 10 वर्षावरील वाणास (जॉफी -9218 विशाल, दिग्विजय विजय, विराट) रूपये 20 प्रती किलो अनुदान वगळता उर्वरित रक्कम महाबीज वितरकाकडे देऊन खरेदी करावे.

गहू 
१० वर्षाआतील वाण २० रुपये प्रति किलो
१० वर्षावरील वाण  १० रुपये प्रति किलो 
संकरित मका  ९५ रुपये प्रति किलो
रब्बी ज्वारी
१० वर्षाआतील वाण ३० रुपये प्रति किलो
१० वर्षावरील वाण  १५ रुपये प्रति किलो 
करडई 
४० रुपये प्रति किलो 
अस अनुदान प्रति शेतकरी २ हेकटर मर्यादेत व एकूण किमतीच्या ५० मर्यादेत दिले जाणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांना mahadbt च्या पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावे लागतील. ऑनलाईन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची लॉटरी पध्द्तीने निवड करून अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.
याचप्रमाणे पीक प्रात्यक्षिक साठी १० हेकटर च्या मर्यादेत गटांना अनुदान दिले जाणार आहे, ज्यात प्रति शेतकरी १ एकर च्या मार्यादेत हे अनुदान असेल,
यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कृषी सहहायक शी संपर्क करावा.