SBI Recruitment : सरकारी बँकेने मागवले 1422 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज

112

SBI CBO Recruitment 2022 सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आली आहे. देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.

पात्र आणि इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया कालपासून म्हणजेच 18 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाली असून 07 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. ज्या उमेदवारांनी स्वतःची नोंदणी केली आहे त्यांना 04 डिसेंबर 2022 रोजी ऑनलाइन चाचणीसाठी उपस्थित राहावे लागेल.

देशभरात 1422 रिक्त पदे भरण्यात येणार असुन. यातील बहुतांश रिक्त पदे ईशान्य विभागातील आहेत, ज्यामध्ये 300 पदे आहेत. त्यापाठोपाठ जयपूर आणि महाराष्ट्रात 200 जागा रिक्त आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी हे या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत. भारतातील अनेक केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.अधिसूचनेनुसार, अर्जदाराचे वय २१ वर्षे ते ३० वर्षा दरम्यान असावे. तसेच अर्जदाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी याशिवाय वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट यासारखी पात्रता असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. सामान्य / EWS / OBC श्रेणीसाठी: रु 750 अर्जाची फी असून SC/ST/PWD श्रेणीसाठी अर्जाच्या फि मध्ये सूट आहे.

SBI CBO Recruitment 2022 अर्ज कसा कराल

सर्व प्रथम SBI च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in/web/careers वर जा

सर्वात वरती JOIN SBI टॅब वर कर्सर घेऊन जा नंतर current opening वर क्लिक करा.

त्यानंतर ADVERTISEMENT NO: CRPD/ CBO/ 2022-23/22 वर क्लिक करा.

त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करा.

आता नोंदणी करा व सूचनांचे पालन करत प्रक्रिया पूर्ण करा.

फॉर्म भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.

आता फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

जाहिरात क्र.: CRPD/ CBO/ 2022-23/22

Total: 1422 जागा 

पदाचे नाव: सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

SC ST OBC EWS GEN Total
209 104 377 138 572 Current 1400
00 13 09 00 00 Backlog 22
209 117 386 138 572 1422

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव. 

वयाची अट: 30 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹750/-    [SC/ST/PWD:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2022

परीक्षा (Online): 04 डिसेंबर 2022