मुल तालुक्यातील चिचाळा येथील घटना वाघाच्या हल्यात दोन गुराखी ठार

73

मुल तालुक्यातील चिचाळा येथील आज दोन गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. चिचाळा येथील नानाजी निकेसर वर अंदाजे ५३ वर्ष, ढिवरू वासलेकर वय अंदाजे ५५ वर्षं असे मृतकाचे नाव आहे. हे दोन गुराखी गावातील गुरे चरण्याकरिता जंगलात गेले होते. तिथे दबा धरून बसलेल्या वाघांनी या दोन्ही गुराख्यावर हल्ला केला आणि जागीच ठार केले.

ही घटना गावात माहिती होताच गावकरी आणि वन कर्मचारी घटनास्थळी गेले आहेत. मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर वाघाचे हल्ले होत असून यामुळे गावकरी दहशतीत आहे.

या भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी असून शेतीच्या कामासाठी गाय आणि बैल आहेत. आता या जनावरांना चारायचे कुठे असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

मूल हा संपूर्ण धान पट्टा आहे, आणि या परिसरातील जंगलव्याप्त भाग असल्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणावर गुरांना चराइसाठी नेहमीच
नेतात. गुराख्याने रोजच्या प्रमाणे आज बुधवारी चिचाळा येथील धिवरू वासेकर वय 55 वर्षे आणि नानाजी निकेसर वय 5ड वर्षे हे गुरांना घेवुन
‘कवळपेठ परिसरात चराई नेले होते, दरम्यान लागूनच असलेल्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने दोन्ही गुराख्य़ावर हलला करून ठार
केले. घटनेची माहीती गावकऱ्यांना होताच गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता चीचपलुली वनपरिक्षेत्र अधिकारी
प्रियंका वेलमे यांच्या मार्गदरशनाखाली तात्काळ आपल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळावर पोहचले सोबत वनविभागाचे
क्षेत्र सहायक मस्के, वनरक्षक मर्सकोल्‌हे, बीट वनरक्षक चौधरी, रोगे, व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहे. |

यासंदर्भात चीचाला येथील ग्राम पंचायत सदस्य तथा मुल तालुका शिवसेना अध्यक्ष प्रशांत गट्टूवार यांनी घडलेल्या घटनेची दखल घेऊन
वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा व वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मृतकांच्या कुटुंबीयांना वन विभागाने सर्वतोपरी मदत द्यावी अशी मागणी
केली असून दोन्ही मृतदेह शव विच्छेदनासाठी उपजिल्‌हा रुग्णालय येथे आणण्यात आले असून मृतकाच्या कुटुंबीयांना वन विभागाकडून
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांच्या हस्ते तात्काळ प्रत्येकी तीस हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली.