पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत मिळणार किसान क्रेडिट कार्ड,मुल व सावली या तालुक्यांमध्ये संबधित पंचायत समिती हॉल

29

Ø 11 व 14 ऑक्टोबर रोजी तालुका व गावनिहाय मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर, दि.10 ऑक्टोबर : केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील पी.एम.किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड प्रदान करण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने पी.एम. किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड प्रदान करण्याकरीता तालुकानिहाय व गावनिहाय मिळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर तालुकानिहाय मेळाव्याचे आयोजन मंगळवार, दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत तर गावनिहाय मेळाव्याचे आयोजन शुक्रवार, दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आले आहे.
तालुकानिहाय मेळावा कार्यक्रमाचे स्थळ :
चंद्रपूर, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, भद्रावती, वरोरा, सिंदेवाही, मुल व सावली या तालुक्यांमध्ये संबधित पंचायत समिती हॉल, राजुरा व बल्लारपूर तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सभागृह, चिमूर तालुक्यात राईस मिल शेतकरी भवन चिमूर, नागभिड तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह नागभिड, ब्रह्मपुरी तालुक्यात विविध कार्यकारी सहकारी संस्था सभागृह ब्रह्मपुरी तर पोभुंर्णा तालुक्यामध्ये सामाजिक सभागृह नगरपंचायत पोभुंर्णा येथे तालुकानिहाय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गावनिहाय मेळावा कार्यक्रमाचे स्थळ :
कोरपना तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आवार गडचांदूर व सांस्कृतिक भवन नांदाफाटा, जिवती तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सभागृह टेकामांडवा, गोंडपिपरी तालुक्यात श्री. कोंडया महाराज मठ धाबा, ग्रामपंचायत भवन भंगाराम तळोधी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सभागृह तोहोगाव व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सभागृह वढोली, राजुरा तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सभागृह विरुर स्टेशन, देवस्थान मंदिर गोवरी, बल्लारपूर तालुक्यात ग्रामपंचायत भवन कोठारी, चंद्रपूर तालुक्यात ग्रामपंचायत मैदान पांढरकवडा, ग्रामपंचायत भवन पिंपरी व सामाजिक भवन ग्रामपंचायत चिचपल्ली, भद्रावती तालुक्यात ग्रामपंचायत सभागृह घोडपेठ, ग्रामपंचायत सभागृह चंदनखेडा व हनुमान मंदिर हॉल नंदोरी, वरोरा तालुक्यात ग्रामपंचायत सभागृह टेमुर्डा, शेतकरी भवन सोईट रोड माढेळी व समूह साधन केंद्र ग्रामपंचायत शेगांव, चिमूर तालुक्यात ग्रामपंचायत हॉल नेरी, हनुमान मंदिर हॉल शंकरपूर, हनुमान मंदिर हॉल खडसंगी व विविध कार्यकारी सहकारी संस्था सभागृह भिसी, नागभीड तालुक्यात साई मंदिर हॉल तळोधी-बाळापूर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सभागृह नवेगाव पांडव व पाहार्णी, ब्रह्मपुरी तालुक्यात सहारे सभागृह गांगलवाडी, तिडके सभागृह चौगान व ग्रामपंचायत सभागृह पिंपळगाव, सिंदेवाही तालुक्यात महादेव मंदिर हॉल नवरगाव, मुल तालुक्यात समाज मंदिर भवन ग्रामपंचायत राजोली, कन्नमवार सभागृह ग्रामपंचायत चिरोली व सांस्कृतिक सभागृह ग्रामपंचायत बेंबाळ, सावली तालुक्यामध्ये बाजार समिती हॉल व्याहाड खुर्द, सेवा सहकारी संस्था मर्या. पाथरी व ग्रामपंचायत भवन लोंढोली तर पोंभुर्णा तालुक्यात ग्रामपंचायत सभागृह भिमणी व ग्रामपंचायत सभागृह देवाडा खुर्द येथे गावनिहाय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव, कृषी सहाय्यक व कार्यक्षेत्रातील बँक प्रतिनिधी यांनी किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. असे जिल्हास्तरीय सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.