मूल येथे “वन्यजीव सप्ताह ” विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

47

मुल – महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग अंतर्गत चंद्रपूर वनविभाग चीचपल्‌ली वनपरिक्षेत्रात दिनांक १ ते ७ ऑक्टोबर २०२२ स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून चीचपलली वनपरिक्षेत्रातील वन्यजीव संरक्षणार्थ जनजागृतीपर ७ ऑक्टोबर रोजी चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल येथे इको पार्क येथन रॅलीचे आयोजन करण्यात आले.रॅलीला वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांच्या नेतृत्वात व नेफडो संस्थेच्या पदाधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखऊन रॅलीची सुरवात करण्यात
आली. रॅलीमध्ये नवभारत विद्यालयाचे एनसीसी विद्यार्थी आणि कर्मवीर महाविदयालयाचे विद्यार्थी तसेच संजीवन पर्यावरण संस्था मूल सदस्ययांचा प्रामुख्याने रॅलीमध्ये समावेश होता. ईको-पार्क मूल येथून रॅलीचे सुरवात होइन मुल येथील स्व. मा.सा.कन्नमवार सभागृह येथे नेण्यात आली कन्नमवार सभागृहात शालेय विद्यार्थीयांना व संस्थेचे सदस्य यांना चंद्रपूर वृत वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक श्री. प्रकाश लोणकर, निखिता चौरे मॅडम सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर,नेफडो संस्थेचे नागोशे मॅडम, चौधरी सर नवभारत विद्यालय मूल राजमलवार मॅडम, नेफडो संस्था चंद्रपूर, संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्षउमेशसिंह झिरे यांनी वन्यजीव संरक्षण याबाबत अतिशय उपयुक्त माहिती आपल्या मार्गदर्शन मधून दिली.वन्यजीव सप्ताह कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा ताडाला येथील चित्रकला स्पर्धा परिक्षेतून निवड केलेल्या विद्यार्थाचा सत्कार मुख्यवनसंरक्षक प्रकाश लोणकर व प्रमुख अतिथी उमेश सिंह झीरे यांचे हस्ते करण्यात आला. तसेच रॅलीत सर्वाची आकर्षीत करणारे वन्यप्राणी यांचेकलाकृर्ती करणाऱ्या मुलाचे उपस्थिती मान्यवरानी कौतुक केले असून त्या पाच मुलांना वनपरिक्षेत्र कार्यालय चीचपल्‌ली तर्फे योग्य बक्षिसे
देण्यात आले सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. विलास कोसनकर वनपाल यांनी केले असून आभार प्रदर्शन क्षेत्र सहाय्यक चीचपल्‌ली घागरगुंडेयांनी मानले.वन्यजीव सप्ताह यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र चीचपल्ली येथीलवनरक्षक,वनकर्मचारी इत्यादींनी परिश्रम घेतले.