कोळसा पुर्नवसन नागरीकांचे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र देण्याकरीता शिबिराचे आयोजन

40

मुल तालुक्यातील चिखली साजा गावाजवळ  कोळसा पुर्नवसन येथील शिबीराचे आयोजन केले. नागरिकांना कागदपत्रे बदल माहिती सांगून मुल तालुक्यातील कोळसा पुर्नवसन वाटप शिबीरात कोळसा हे गाव सन 2022 मध्ये पुनर्वसन झाले असून सदर गाव चंद्रपूर तालुक्यातुन मुल तालुक्यात पुनर्वसन झाले आहे. त्यानुषंगाने सदर गावातील नागरीकांचे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र देण्याकरीता दिनांक 06/10/2022 व 07/10/2022 रोजी दुपारी 12.00 वाजता मौजा कोळसा पुनर्वसन गावात शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मुल तालुक्यातील तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी हयंानी गावातील नागरीकांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्रासाठी काय काय कागदपत्रे लागतात ,सविस्तर माहिती सांगितली तसेच नागरीकांना कोणत्याही प्रकारचा आर्थीक बोझा पडता कामा नये त्याचं काम तिथेच व्हायला पाहीजे या दुष्टीने सेतू केंन्द्र उपस्थित करून दिले,प्रकल्पग्रस्ताच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी  शिबिर आयोजित करुन प्रमाणपत्राचे वितरण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी पुनर्वसन विभागाला दिल्या.प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
उपस्थित गावातील नागरीक,युवक -युवती ,ज्येष्ठ नागरीक,महिला ,वनकर्मचारी,पुर्नवसन अधिकारी,संबंधीत कर्मचारी,तलाठी,मंडळ अधिकारी, प्रमोद मशाखेत्री महाऑनलाईन सुविधा केन्द्र,मूल,जयंत लोनबले स्टॅम्प वेडर,श्री प्रभू वाळके दस्तलेखक उपस्थित होते.