समाजकार्य महाविद्यालय चंद्रपूर व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग चंद्रपूर यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

41

स्व.सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली, चंद्रपूर व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग सहायक आयुक्त समाज कल्याण,चंद्रपूर सेवा पंधरवाडा निमित्त ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शनाचे कार्यक्रम मौजा खुटाळा या गावी आयोजित केले होते.यावेळी जेष्ठ नागरिकांना येणाऱ्या आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या व त्यावर उपाय योजना व त्या वेळेत वृद्धांनी कशी काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावातील ज्येष्ठ नागरिक सौ.जिजाबाई घाटे या उपस्थित होत्या,प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद व उच्च प्राथमिक शाळा खुटाळा येथील शिक्षिका सौ.सविता बांबोडे मॅडम या उपस्थित होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.प्रगती नरखेडकर ह्या उपस्थित होत्या.हा कार्यक्रम एस.आर.एम कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली,चंद्रपूर चे प्राचार्य डॉ.सुनिल साकूरे सर यांच्या नियंत्रणात व प्राध्यापिका डॉ.प्रगती नरखेडकर मॅडम यांच्या मार्गर्शनात आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस.आर.एम कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली,चंद्रपूर येथील एम.एस.डब्ल्यू द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या सामुदायिक विकास या विशेषीकरणाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे संचालन पुनम रामटेके या विद्यार्थिनीने केले तर पाहुण्यांचे आभार प्रतीक्षा मातेरे या विद्यार्थिनीने केले.व कार्यक्रमाला आयोजक लाभलेले विद्यार्थी अमोल कोरवते उपस्थित होते.