मूल वासियांचे दखलपात्र ‘मूक आंदोलन’ मालधक्का आंदोलनाला उभारी देणारे

27

गांधी जयंतीच्या पवित्र पर्वावर मूलवासियांनी पुकारलेले मूक आंदोलन यशस्वी तर झालेच त्याहीपेक्षा अनेक अर्थाने दखलपात्र ठरलेअसे म्हणता येईल.मूल शहराला प्रदुषित करु पाहणारी रेल्वे प्रशाशनाची कलुषित धारणा हाणून पाडायला मूक आंदोलनातून माल धक्का हटाव मोहिमेला उभारी येणार हे आता जवळपास निच्छीत म्हणता येईल व यामूळे हे आंदोलन दखलपात्र आहे. मालधक्का हटाव मोहिमेला किंबहुना जो “वॉर्म अप” हवा होता तो शांतीच्या मार्गातुन गवसला असे म्हणायला हरकत नाही.अनेक गटांनी मिळून केलेले आंदोलन म्हंटल की मतभिन्नता,मनभिन्नता ही आलीच.कारण यात अनेकांच्या अनेक महत्वाकांक्षा असतात.मात्र प्रत्येक मूल वासियांचा प़ामाणिक उद्धेश मालधक्का हटाव हाच आहे हे आजच्या शांतीपूर्ण मूक आंदोलनाच्या भरगच्च प्रतिसादातून लक्षात येते.आता हे आंदोलन अनेक गटांचे राहीले नाही तर ते एका तालुक्याचे झाले आहे.व्ययक्तीक महत्वाकांक्षेपेक्षा सार्वजनिक उदिष्टाचे दिशेने बहुमत आहे. हे सुद्धा मूक आंदोलनातून स्पष्ट झाले.सुरजागढ लोह खनिज प्रकल्प पळदयामागून कोण चालवितात?याचे दबंग पार्टनर कोण?दबंग मालक कोण?यात आजी माजी नेत्यांचे कसे भले होत आहे?कुणाचे किती हायवा कामावर आहेत? या प्रश्नाना आता मागे टाकून पुढची आंदोलनाची धार कशी तेज होईल यावर चिंतन करण्याची शक्ती महात्मा गांधींच्या प्रेरणेने लाभलेल्या मूक आंदोलनातून मूलवासियांना मिळाली ही बाब सुद्धा दखलपात्र नाही का? मूक आंदोलनाची दखल साऱ्या राजकिय पक्षांनी घेतली तेव्हाच विवीध पक्षांमधील बहुतांश कार्यकर्ते आज एकत्रीत आलेत ही मालधक्का हटाव आंदोलनाची मोठी मिळकत आहे.मूक आंदोलनाची धग मोठया नेत्यापयंत पोहोचली आहेच.,’अंत भला तो सबा भला’. गत दोन महिण्यांपासून एकमेकांना रस्ते दाखविण्यासाठी आपण पुढाकार घेत आहोत.आता मात्र मूक आंदोलनातून कुठल्याही वाटेने जा पण मालधक्का  हेच उदिष्ट राहील हे स्पष्ट आहे.सारे राजनितीक पक्ष,गट,ग़ुप,संघटना,मंडळे यांनी मालधक्का विरोधी आंदोलनासाठी पुढाकार घेणाऱ्यांना शक्ती दिल्यास आरोप-प्रत्यारोप होणार नाहीत.कुणी एकटा क़ेडिट ध्यायला धजावणार नाही हे ही आजच्या मूक आंदोलनाच्या संवेदनशिलतेने लक्षात आणून दिलेआहे व ही बाब सुद्धा दखलपात्र ठरते. जाणकारांच्या मते मालधक्का न्यायालयीन मार्गाने हटविण्यात अनेकअडचणी येतील.एकत्रीतपणे आंदोलनाची धार तेज करणे,राजकिय  इच्छाशक्तीला आपल्या मालधक्का हटाव मोहिमेचा भाग बनविणे,शक्यतोवर आपली वयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेवल्यास सुरजागढ लोह खनिज मूलकडे भटकणार नाही हेच खरे.