संजय गांधी निराधार योजनेच्या समित्या रद्द ‘पालकमंत्र्यांच्या शिफारशीने होणार नियुक्त्या

55

 महाराष्ट्र शासनाच्या  विशेष साहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्यात  राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा
लाभ पात्र लोकांपर्यंत  पोहोचविण्यासाठी मंजुरी देणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना   समित्यांवरील अध्यक्ष व अशासकीयसदस्यांच्या नियुक्त्या सामाजिक न्याय  विभागाने २९ सप्टेंबर रोजी आदेश  काढून रद्द केल्या आहेत. जून महिन्यात
झालेल्या सत्तांतरानंतर राज्यात नवे. सरकार आल्याने आता नव्या ‘पालकामंत्रयांच्या शिफारशी नंतर पुन्हा नव्या समित्या स्थापन केल्या जाणारआहेत.

राज्यात जून महिन्यात सत्तांतरझाले. या सत्तांतरानंतर महाविकासआघाडीचे सरकार पायउतार होऊन नवे
शिंदे सरकार स्थापन झाले आहे. नव्यासरकारने जुन्या सरकारचे अनेकनिर्णय बदलले तसेच विविध समित्याहीरद्द केल्या आहेत. २९ सप्टेंबरला ही  संजय गांधी निराधार अनुदान योजना समित्यांवरील अध्यक्ष व शासकीयसमित्यांच्या नियुक्त्या सामाजिकन्याय विभागाने एक आदेश काढून रदकेल्या आहेत.

या समितीचा अध्यक्ष वअशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यापालकमंत्र्यांचा शिफारशीनुसारकेल्या जातात. नव्या सरकारने तीनमहिन्यानंतर पालकमंत्र्यांची नियुक्‍तीकेली आहे. त्यामुळे संजय गांधीनिराधार योजनेच्या पूर्वी स्थापनकेलेल्या समित्या रद्द करून आतानव्या समित्या नियुक्त केल्या जाणारआहेत. नव्या समित्या स्थापन होईपर्यंत तहसीलदारांच्याअध्यक्षतेखालील समित्या कार्यरतराहतील. या समित्यांमार्फत दरमहिन्याला बैठक घेऊन योजनेचा लाभमिळविण्यासाठी आलेल्या अर्जावरनिर्णय घ्यावयाचे अधिकार यासमितीला राहणार आहेत, असे याशासन आदेशात म्हटले आहे. त्यामुळेआता नवीन पालकमंत्री यांच्याशिफारसीने नवे अध्यक्ष व अशासकीय सदस्य निवडले जातील.