महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक

72

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सरकारमध्ये नोकरीसाठी दरवर्षी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करत असतात. याच विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. २०२३ साली MPSC कडून घेण्यात येणाऱ्या परिक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर झालं आहे.

MPSC च्या २०२३ या वर्षांत होणाऱ्या परिक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर झालं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना https://mpsc.gov.in/ या साईटवर जाऊन पाहता येणार आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर, ७ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर आणि ९ ऑक्टोबर या ४ दिवशी होणार आहे. तसंच याचा निकाल अंदाजे जानेवारी २०२४ मध्ये लागेल. याशिवाय अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या अंतर्गत १० पदांसाठी जानेवारी २०२३ मध्ये जाहीरात निघेल. ३० एप्रिल रोजी परीक्षा पार पडेल.