सुपुष्पमंगल कला संच येरगाव पथनाट्य स्पर्धेत राज्यातून प्रथम

113

मुल – मान. शिवानीताई वडेट्टीवार सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांचे नेतृत्वात लडकी हू लड सकती हू या अभियानांतर्गत संपुर्ण राज्यभरात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्याने आयोजित केलेल्या राज्य स्तरीय पथनाट्य स्पर्धेचे आयोजन केलेले होते. या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या पथनाट्य संचा मधुन सुपुष्पमंगल कला संच येरगाव या संचाने राज्यातून पहिला क्रमांक पटकावलेला आहे.

सुपुष्पमंगल कला संच यांनी पेट्रोल, डिझेल खाद्य तेल, सिलेंडर या देशभरातील ज्वलंत महागाईचा विषय घेवुन महागाई चा विळखा या वर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. या वेळी संचातील कलावंत मंगल मशाखेत्री – संच प्रमुख , पिंटू खोब्रागडे, शुभम (माळी) गुरनुले , राहुल चीताडे, विट्टल बोरकुटे, धिरज पाल, शुभम रामटेके, रोशन लाटेलवार, करिश्मा नैताम, काजल मेश्राम या सहभागी सर्व कलावंतांचे व संपुर्ण सुपुष्पमंगल कला संचाचे राज्यभरातून अभिनंदन केल्या जात आहे.