शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

46

एकात्मिकफलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना

चंद्रपूर, दि. 14 सप्टेंबर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण हा घटक पाण्याचा साठा निर्माण करणे व साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा, या उद्देशाने 50 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केले आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना शेततळ्याच्या आकारमान निहाय अनुदान देय आहे.

यामध्ये वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या घटकासाठी 15×15×3 मीटर आकारमान निहाय 28 हजार 275 इतके 50 टक्के प्रमाणे अनुदान देय राहील.2 0×15×3 मीटर आकारमानास 31 हजार 598, 20×20×3 मीटर आकारमानास 41 हजार 218, 25×20×3 मीटर आकारमानास 49 हजार 671, 25×25×3 मीटर आकारमानास 58 हजार 700, 30×25×3 मीटर आकारमानास 67 हजार 728, तर 30×30×3 मीटर आकारमानास 75 हजार इतके अनुदान देय राहील.

   तरी, शेतकऱ्यांनी या घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सिंचन सुविधा या घटकाखाली अर्ज करावेत. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.