मारोडा सर्कल मध्ये पोषण महा अभियान बालके आंनदी मुल तालुक्याची कुपोषण मुक्तीकडे वाटचाल

39

मुल:- एकात्मिक बालविकास सेवा योजना मुल सर्कल मारोडा येथील अंगणवाडी मध्ये पोषण अभियानाबाबत विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान.श्री भीकारूजी शेंन्डेग्रामपंचायत सरपंच यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमूख उपस्थिती ग्राम पंचायत सौ. सरिताउत्तरवार,सौ,अर्चना उईके,गावातील बचत गट महिला,एकात्मिक बाल विकास पर्यवेक्षिका सौ.वनिता गंदेवार मॅडम,अंगणवाडी सेविका,मदतनिस किशोरी मुली उपस्थित होत्या.
यावेळी आहाराचा विविध प्रकारच्या पाककृतीचे व रानभाजीचे प्रदर्शन करण्यात आले.
पोषण प्रतिज्ञा घेण्यात आली. कुपोषणाचे प्रमाण कमी करणे,मुलीच्या जन्माचे स्वागत करणे,अंगणवाडीच्या माध्यमातून समाजात आहार,आरोग्य,व स्वच्छता हा संदेश गावागावात घरोघरी पोहचविण्याच्या उदेशाने पोषण महाअभियान अंतर्गत पोषण रॅलीकाढण्यात आली.श्सत गरोदर,स्तनदा,किशोरीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.सौ.वनिता गंदेवार मॅडम यांनी प्रस्ताविक मध्ये सांगितले कि, महिला व बालकल्याण मंत्रालयामार्फत 1ते30 सप्टेंबर हा महिना पोषण महाअभियान म्हणून शासन राबवित असुन यात महिलाव त्यांचे आरोग्य,कुपोषण,शिक्षण तसेच गरोदर,स्तनदामाता आणि मुले,मुली यांनी आपल्या
आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी आणि आहार,स्वच्छता,लसीकरण यामुळे आपले आरोग्य
कसे चांगले ठेवता येईल यावर मार्गदर्शन केले.तसेच ग्रामपंचायत सदस्या सौ.सरिता उत्तरवार यांनी गरोदर मातेनी कसा आहार घ्यायला पाहिजे,खर्रा,घूटका यांचे सेवन न करणे,तसेच पिण्याचे पाणी,स्वच्छता,लसीकरण यावर थोडक्यात
मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन सौ.मंजुषा सहारे,अंगणवाडीसेवीका तर आभार अंगणवाडी
सेविका,आनंदाताई देऊरवार यांनी केले.