डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरी केली जातो.

43

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरी केली जातो.
नव भारत कन्या विद्यालय मुल येथे स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त स्वयम शासनाचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षकांच्या भूमिका साकार केल्या ,आपल्यातील असलेले कला कौशल्य या उपक्रमा मधून विद्यार्थिनींनी निदर्शनास आणून दिले. मुख्याद्यापिकेची जवाबदारी कू.सलोनी गुलभमवार आणि पर्यवेक्षकाचि जवाबदारी विजयालक्ष्मी घाटबांदे हिन पार पाडली, इतर विद्यार्थिनींनी शिक्षकाची जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडली.
या उपक्रमात संपूर्ण शालेय प्रशासन विद्यालयाने विद्यार्थिनीच्या सुपूर्त करण्यात आला होता, व विद्यार्थिनीने तो उत्तम रित्या सांभाळला. स्वयंशासनाचा परीक्षण शालेय स्तरावर करण्यात आला. उत्कृष्ट शिक्षण शैली असलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमामध्ये विद्यालयाच्या शिक्षिका ku. मंजुषा पंधरे यांनी इयत्ता ५ वी मधील विद्यार्थिनींना आसाम प्रदेशातील व महाराष्ट्र प्रदेशातील लोकांची वेशभूषा करून दोन जोडप्यांना उपस्थित विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षिका यांचे पुढे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची व विद्यार्थिनींमधील असलेली कार्यकुशलता बद्दल विद्यार्थिनींची प्रशंसा संस्थेचे सचिव ऍड. अनिल वैरागडे, गावातील नागरिक, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मंगला सुंकरवार विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर पुराम सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केली. कन्या विद्यालयात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.