संत निरंकारी मंडळ दिल्लीच्या आदेशानुसार मुल येथील धन्य निरंकारी शाखेच्या वतीने दिनांक 4 सप्टेंबर 2022 ला शाखेच्या कार्यालयात रक्तदान हे श्रेष्ठदान हे उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपल्या दान केलेल्या रक्ताने गरजू देशवासी यांचे प्राण वाचविता येईल या उदात्त हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकूण 110 रक्तदात्यांनी आपल्या नावाची नोंद केली त्यापैकी काहींना उच्च रक्तदाब तर इतर आजार काहींना मधुमेह अशा लोकांना वगळता एकूण 65 लोकांनी इथे रक्तदान केले .
या कार्यक्रमाचे उद्घाटक किशन नागदेवे झोन इन्चार्ज यांनी केले .
सदर कार्यक्रम लक्ष्मण निकुरे मुखिया मूल यांचे अध्यक्षतेखाली तर खुशाल झोडगे नांदगाव ,अशोक बोरकुटे चामोर्शी यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. दिनांक 3 /9 /2022 ला रक्तदान करण्याकरिता जनजागरण रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये “रक्त नाडीयो मे बहना चाहिए, नालीयो मे नही” अशा घोषणा देत रॅली संपूर्ण शहरात फिरवण्यात आली. याकरिता गडचिरोली येथून रक्त संकलन करण्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम मुल येथे दाखल झाली होती, या टीमचे डॉक्टर अशोक तुमरेट्टी रक्त संकलन अधिकारी व कुमारी प्रतीक्षा कटांगे,बंडू कुमरे, कुमारी मोहिनी ,निलेश सोनवणे, जीवन गेडाम, या टीमने रक्त संकलनाचे कार्य केले .या कार्यक्रमाकरिता मोहन रेड्डीवार ,गोविंद कटकेलवार, इंदिरा संधावार , भोजराज सिडाम ,कवडू कोल्हे, मारोती भोयर ,अर्चना लेनगुरे वागू नक्षूलवार ,डॉक्टर नामदेव सोनुले, संतोष निकुरे यांनी अत्यंत परिश्रमाने मोलाचे कार्य केले .