पंचायत समिती मूल येथील शिक्षण विभागाच्या वतीने येथील नवभारत कन्या विद्यालयामध्ये तालुका स्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेचे

61

पंचायत समिती मूल येथील शिक्षण विभागाच्या वतीने येथील नवभारत कन्या विद्यालयामध्ये तालुका स्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर नाट्यस्पर्धेचे उद्घाटन कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मंगला सुंकरवार यांचे हस्ते तर शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री गुज्जनवार, पर्यवेक्षक सुधाकर पुराम, नाट्यकलाकार सुनील कुकुडकर , विज्ञान शिक्षक, वाळके सर, अशोक येरमे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
वर्ग ६ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्यामागील मुख्य हेतू विद्यार्थी शिक्षक आणि जनसामान्यांना वैज्ञानिक माहिती घटना आणि संकल्पना मनोरंजक पद्धतीने देता यावी, तसेच विज्ञान नाट्य तील विज्ञान लोकप्रियता लोकप्रिय व्हावे आणि मनोरंजकता सोबत समाज प्रबोधन व्हावे, या उद्देशाने शासन स्तरावर हे उपक्रम राबविण्यात येत आहे .नेहरू विज्ञान केंद्र मुंबई यांच्या आदेशान्वये शिक्षण क्षेत्रामध्ये विज्ञान महोत्सवाचे ठिकठिकाणी आयोजन केले जात आहे. यातील विषय १)लसीकरण कथा २) महामारी सामाजिक वैज्ञानिक समस्या ३) जीवनमानांचा दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचे संशोधन ,आणि ४) मूलभूत विज्ञान व शाश्वत विकास या विषयावर ही नाट्य स्पर्धा घेण्यात आली .
आयोजित स्पर्धेत बालविकास विद्यालय मूल, प्रथम क्रमांक, नवभारत कन्या विद्यालय मूल,द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोसंबी या शाळांनी पटकाविला. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील दहा शाळांनी आपला सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे परीक्षण नाट्य कलाकार सुनील कुकुडकर, विज्ञान शिक्षक वाळके सर, संगीत विशारद अशोक येरमे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प.स. शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी जयश्री गूज्जनवार ,नीलिमा रापर्तीवार,मया झरकर, सचिन पुल्लावार यांनी अथक परिश्रम केले.