महसूल विभागाचे आवाहन:शेतकऱ्यांनी आपली ईकेवायसी करून घ्यावी-तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी

55

पीएम किसान सन्मान निधी ऑनलाइन केवायसी करीता 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

तालुक्यातील पी एम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावी, असे आवाहन महसुल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शहर व तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जात आहे.

त्यात आणखी पारदर्शकता यावी, म्हणून लाभ मिळणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आता आपली ई केवायसी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र आदी ठिकाणी जाऊन आपली ई केवायसी अपडेट करून घेण बंधनकारक आहे.

7  सप्टेंबर शेतकऱ्यांची ई केवायसी झाली नसेल, त्यांना पी एम किसान सन्मान योजनेचा यापुढे लाभ मिळणार नाही, असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. शेतकऱ्यांकडे ई केवायसी अपडेट करण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक असणे बंधनकारक आहे. केवायसी शेतकरी आपल्या मोबाइल द्वारे देखील करु शकतात.

ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी आहे त्यांची यादी गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक तसेच ग्रामपंचायतीमधील आपले सरकार केंद्रावर देखील उपलब्ध आहे.पीएम किसान सन्मान निधीच्या ऑनलाईन केवायसीची मुदत आता 7 सप्टेंबर 2022 पर्यंत करण्यात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी शेतक-यांनी त्वरीत ऑनलाईन केवायसी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळीयांनी केले आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन केवायसी केल्यास त्यांच्या खात्यात सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. ऑनलाईन केवायसी केले नाही तर सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. सदर योजना ओटीपीवर आधारित असून लाभार्थी शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक पीएम किसानचे वेबपोर्टल किंवा जवळच्या कॉमन सर्विस सेंटरशी सलग्न असावा.

ऑनलाईन केवायसीकरीता राबविण्यात येणारी प्रक्रिया :ओटीपी मोड (मोबाईलद्वारे / संगणकाद्वारे) : पीएम किसानच्या अधिकृत वेब पेजला https://pmkisan.gov.in/ भेट द्या. वेब पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ई-केवायसी पर्यायाला क्लिक करा. स्वतःचा आधारकार्ड क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून सर्च करा.

आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका आणि क्लिक करा. ओटीपी आल्यानंतर संबंधित जागेवर ओटीपी भरा व सबमीट करा.बायोमेट्रीक मोड (महा ई सेवा केंद्रातून) : नजीकच्या नागरी सेवा केंद्रावर (सीएससी) जाऊन प्रक्रिया करता येईल. तसेच ई-सेवा केंद्रावर जातांना आपल्या आधारकार्डची झेरॉक्स सोबत घेऊन जा.वरीलप्रमाणे ई – केवायसी पूर्ण करा आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्या, 

तरी तालुक्यातील पी एम किसान योजनेतील पात्र व ई केवायसी अपडेट न केलेल्या शेतकऱ्यांनी 7  सप्टेंबर आपली ई केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी यांनी केले आहे.