श्री गणेश उत्सावाच्या पार्श्वभूमीवर मुल पोलीसांचा रुट मार्च

43

गणेशोत्सवाच्या पार्ड्वभूमीवर आज रविवार 04 सप्टेंबर रोजी सकाळी  पोलीसांतर्फे गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर रूट मार्च काढण्यात आला.गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने डोके वर काढले होते. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात सांस्कृतीककार्यक्रम व सण साजरे करण्यास मनाई करण्यात आले होते. दरम्यान, यंदा कोरोना रूग्ण संख्य़ाआटोक्यात आल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

यंदा गणेशोत्सवात नागरीकांमध्ये उत्साह दिसून आला. घरोघरी आणि गल्‌लोगल्‌ली गणेश मंडळाची
स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, गणेशोत्सव शांततेत साजरा होण्याच्या पार्वभूमीवर मुल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत,  यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव निमीत्य कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मूल शहरातील तेली मोहल्ला,ढीवर मोहल्ला, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिख मोहला, जुना रेल्चे स्टेशन, गांधी चौक, बस स्टॉप, सोमनाथ मार्ग
यासह शहरातील मख्य मार्गाने व गर्दीचे ठिकाण, मिश्र वस्ती आणि संवेदनशील भागातून मूल पोलीस स्टेशनच्यावतिने रुट मार्च काढण्यात आलेसदर रुट मार्च मध्ये 6 अधिकारी ३5 अंमलदार, एस आर पी एफ विभाग 1, आर सी पी 1 अधि, 19 अंमलदार व सैनिक24 सहमागी झाले होते.

 

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर रूट मार्च काढण्यात आला.यावेळी मुल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत,  पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक,पोलीस कर्मचारी, यांच्यासह विविधविभागातील पोलीस कर्मचारी व फौजफाटा उपस्थित होते.