मुल तालुक्‍यातील मौजे चितेगावं येथील वाघानं केला शेतकऱ्यावर हल्ला अन्…….

45

मुल – आज शेतकरी बांधवांचा पोळा हा महत्वाचा सण शेतकरी आपल्या घरी असलेल्या बैल,गाई,सह इतर गुरांना आंघोळ घालून रंग देऊनमोठ्या उत्साहाने सजवतात त्याला मारुतीच्या देवळात नेऊन दर्शन घेतात नैवेद्य चालून मगच शेतकरी बांधव जेवण करतात ही रूढी परंपरासर्वत्र अजूनही राखली जात आहे.अशाच महत्वाच्या सणाच्या दिवशी

तालुक्यात चितेगावं गावात शेतक-यावर वाघाने हल्ला केला.मुल तालुक्‍यातील मौजे चितेगावं येथील शेतकरी युवक रवींद्र श्रीरंग गोहणे वय (४५) आपल्या बैल व इतरजनावरांना घेऊन शेतशिवारा लगत असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक सावली उपझेत्र राजोलीच्या चितेगावं बिटातील कक्ष क्रमांक१७७८ मधील जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने रवींद्र गोहणे यांचेवर हलुला करून गंभीर जखमी केले.याबाबतची माहिती गावकऱ्यांना कळताच बीट गार्ड धनवीजय यांनी ग्रामस्थांना घेऊन तात्काळ उपचारासाठी उपजिल्‌हा रुग्णालय मुल येथेभरती करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथील जिल्‌हा रुग्णालय येथे हलविण्यात आले.ऐन शेतकऱयांच्या बैल पोळ्याच्या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला केल्याने चीतेगावत पोळ्याच्या सनावर विर्जन पडल्याने गावातउत्साहात देखील शेतकरी नाराज होऊन बसले आहेत. याभागात नेहमीच वाघाची दहशत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर वनविभागाने ववनाधिकारी यांनी वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी चितेगावं व परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक सावली राजुरी उपक्षेत्रातील चितेगाव बिटातील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी चार वाजता चे दरम्यान घडली.रवींद्र श्रीरंग गोहने वय 45 राहणार चितेगाव असे या जखमी इसमाचे नाव आहे. रवींद्र हा स्वतःच्या मालकीचे जनावरे चितेगाव येथील शेतशिवारात चरायला नेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करुन गंभीर जखमी केलेघटनेची माहिती होताच जखमीला गावातील लोकांनी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.