युवा क्रांती संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख आकाश येसनकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

53

युवा क्रांती संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख आकाश येसनकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वायफळ खर्च टाळून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,विहीरगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप📕🖊️📗📘📙🖌️📚

मूल :- सामाजिक उपक्रम राबवणे हाच वाढदिवस साजरा करण्या चा उद्देश असतो.वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित केले.यामध्ये मुलांना चित्रकलेची आवड निर्माण होण्यासाठी ड्रॉइंग सीट,स्केच पेन,पेन्सिल, शॉपनर बुक पेन व खाऊ चे वाटप करण्यात आले.
सध्या सर्वत्र धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच वाढदिवस मोठा खर्च करून साजरे करण्यात येत आहेत. अनावश्यक खर्चाला फाटा देत युवा क्रांती संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख आकाश येसनकर यांच्या वाढदिवस सामाजिक कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला असून, हार-फेटे, पुष्पगुच्छ, फटाके, साऊंड सिस्टिम, डीजे या गोष्टीला टाळून समाजात चांगला संदेश देण्याचे काम वाढदिवसाच्या माध्यमातून करण्यात आले. सामाजिक आत्मभान कायम ठेवून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या बंद झाली आहे. क्वचितच असा उपक्रम पाहायला मिळत आहे.युवा क्रांतिकारी संघटने तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समाजातील रांजल्या- गांजलेलया, पिचलेल्या लोकांना आधार देण्याचे काम युवा क्रांती संघटनेचा माध्यमातून केले जाते , इथून पुढच्या काळात वाढदिवस थाटामाटात न करता युवा क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांचे वाढदिवस सामाजिक कार्यातून केला जाणार आहे याची शाश्वती आकाश येसनकर यांनी दिली. यावेळी लहान मुलांच्या हस्ते केेक कापन्यात आला . कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते मा. महेंद्रजी गोंगले आभार प्रदर्शन सुरज गेडाम यांनी केले.यावेळी मुख्याध्यापक सिडाम मॅडम,सोनुले मॅडम व युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष निखिलभाऊ वाढई, सोनूभाऊ बट्टे,प्रणितभाऊ पाल,निहाल गेडाम, सुधीर वाढगुरे, हर्षल भुरसे, रोहित खोब्रागडे, राहुल बघमारे, चेतन दहिवले, धनराज चिमुलवार, साहिल खोब्रागडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

✍️ वाढदिवसाच्या दिवशी आर्थिक उधळपट्टी करीत वाढदिवस साजरा करणारे अनेक जण असतात. पण लहान मुला-मुलींच्या चेहर्‍यावर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आनंद फुलविणारे फारच कमी असतात. ‘वाढदिवस’ लहान मुला मुलीं बरोबर साजरा केला आणि जगातील सगळ्यात सुंदर गिफ्ट त्यांनी मला दिल ते म्हणजे ‘आनंद’ आणि ‘समाधान या मुला-मुलींच्या चेहर्‍यावरील हास्य फुलल्याने आपला वाढदिवस खर्‍या अर्थाने साजरा झाला.
–आकाश येसनकर ,
प्रसिद्धी प्रमुख युवा क्रांती संघटना, मूल